सूर्यनमस्कार


 सूर्यनमस्कार


शारीरिक शिक्षण अभ्यासक्रमात आरोग्य दृष्टीत शारीरिक सुदृढतेला महत्त्व दिलेले आहे. विद्यार्थ्यांची शारीरिक, मानसिक व बौद्धिक क्षमता वाढवणारी व त्या क्षमतेला त्यांना सत्य प्रवृत्तीकडे नेणारी व चैतन्य निर्माण करणारी जी शक्ती ती सूर्य शक्ती होय. आणि या सूर्यनारायणाला अष्टांगानी (शरीराची आठ अंगे) केलेला नमस्कार म्हणजे सूर्यनमस्कार होय. या व्यायामामुळे शरीराचे स्नायू कार्यक्षम होतात. शरीर निरोगी बनते.
सूर्यनमस्कार हा सर्वांग व संतुलित व्यायाम प्रकार असल्याने विद्यार्थ्यांनी किमान रोज दहा ते बारा सूर्यनमस्कार घालावेत.
कृती: सुरुवातीची स्थिती हात छातीसमोर नमस्कारा प्रमाणे जोडलेले असावेत.
१) दोन्ही हात सरळ वर करुन मागे न्यावे. त्याच वेळी कमरेतून शरीर शक्य तितके मागे न्यावे. डोकेमानेतून मागे न्यावे. दृष्टी वर असावी.
२) दोन्ही हात समोरून खाली आणावे. पाय गुडघ्यात न वाकवता तळहात पावलांच्या बाजूला जमिनीवर टेकवावे मस्तक गुडघ्यांना लावण्याचा प्रयत्न करावा.
३) प्रथम डावा पाय मागे नेऊन चवडा व गुडघा जमिनीला टेक वा वा कोपर ताठ ठेवून डोके मागे झुकवावे. छाती पुढे काढावी दृष्टी आकाशाकडे ठेवावी.
४) उजवा पाय मागे नेऊन डाव्या पायाच्या जवळ ठेवावा दोन्ही पाय सरळ ठेवून हात कोपरांत न वाकविता संपूर्ण शरीर एका रेषेत आणावे दृष्टी जमिनीकडे ठेवावी. ५) हा कोपरांत वाकवत छाती, मस्तक व गुडघे जमिनीला टेकवावे कोपर पसरू देऊ नयेत.
६) हात कोपरांतुन सरळ करस छाती पुढे काढावी. डोके मानेतून मागे वळवावे व दृष्टी आकाशाकडे असावी.
७) कंबर वर उचलत टाचा जमिनीवर टेकव्यात पाय गुडघ्यांत सरळ व हात कोपरांत सरळ ठेवून शरीर मागे खेचावे हनुवटी छातीला लावावी.
८) डावा पाय पुढे आणून दोन्ही हातांच्या मध्ये ठेवावा उजव्या पायाचा चवडा व गुडगा जमिनीवर टेकलेले असावेत दोन्ही हातांची व पायांची बोटे एका रेषेत असावीत.
९) उजवा पाय पुढे आणून डाव्या पाया शेजारी ठेवावा गुडघे ताठ ठेवून ओणवे व्हावे व कपाळ गुडघ्याला लावण्याचा प्रयत्न करावा.
१०)हात छातीसमोर नमस्कारा प्रमाणे सुरुवातीच्या स्थितीत यावे.
सलग तीन ते पाच नमस्कार घालावे.
सरावाने होणारे फायदे:
१) दमश्वास क्षमता वाढते.
२) स्नायू लवचिक होतात.
३) स्नायूंचा दमदारपणा वाढतो.
४) सर्वांग व्यायाम होतो.
५) एकाग्रता वाढते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या