कबड्डी खेळासाठी पूरक व्यायाम

 


विविध खेळांसाठी पूरक व्यायाम


कबड्डी खेळण्यासाठी पूरक व्यायाम:
१)मागे पाय मारणे :खांब ,खुर्ची ,टेबल इत्यादींचा आधार घेऊन पाय मागे व जास्तीत जास्त उंचावर मारण्याचा सराव करा.
२)टांगलेल्या चेंडूला पायाने मारणे: एका दोरीला चेंडू बांधून तो ठराविक अंतरावर लटकवा आणि त्याला मागे पाय मारून टोला द्या.
३)पायाने बाटली पाडणे :एकाला त्याच्या छातीच्या उंचीपर्यंत पुठ्ठ्यावर प्लास्टिकची बाटली ठेवून उभे राहण्यास सांगा आणि मागे पाय मारुन ती बाटली पाडण्याचा प्रयत्न करा.



थोपवून धरणे:
१)वर्तुळात उभे राहून प्रतिस्पर्ध्यास वर्तुळाच्या बाहेर ढकलण्याचा प्रयत्न करा असे करताना प्रतिस्पर्धी आपणास बाहेर ढकलू शकणार नाही. अशा प्रकारे त्याला थोपवून धरा.
२)तीन- तीन मीटर अंतरावर तीन समांतर रेषा आखा उभे राहून प्रतिस्पर्ध्याला त्याच्या मागच्या रेषेच्या पलीकडे ढकलण्याचा प्रयत्न करा.



जखडून ठेवणे:
प्रतिस्पर्धी व वर्तुळाच्या बाहेर जाऊ नये, म्हणून त्यास जखडून ठेवा.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या