रिंगण टेनिस

 रिंगण टेनिस 


साहित्य : रिंग
क्रीडांगण : एकमेकांमध्ये चार मी अंतर ठेवून दोन समांतर रेषा आखून घ्या.
खेळाचे नियम व पद्धती : सहा ते आठ विद्यार्थ्यांचे दोन समान गट तयार करून त्यांना दोन्ही रेषांवर समोरासमोर उभे करा एका गटाच्या एका विद्यार्थ्याकडे रिंग असेल.शिक्षकांनी शिट्टी वाजवताच रिंग असलेला विद्यार्थी ती रिंग समोरच्या गटातील कोणत्याही विद्यार्थ्याकडे फेकिल. त्या विद्यार्थ्याने रिंग पकडून ती तो परत विरुद्ध गटाकडे फेकील. अशा रीतीने हा खेळ चालेल. जेव्हा एका गटातील विद्यार्थ्याला पकडता न आल्याने ती खाली पडेल.त्या वेळी ती रिंग फेकणाऱ्या गटाला एक गुण मिळेल.तसेच रिंग न फेकता ती एखाद्या खेळाडूने पाच सेकंदा पेक्षा अधिक वेळा पर्यंत हातात धरून ठेवली तर ती विरुद्ध गटाला एक गुण मिळेल.रिंगण रेषेच्या व मागूनच फेकली पाहिजे. तसेच दुसऱ्या गटातील विद्यार्थ्यांकडे डगमगत जाईल. अशा प्रकारे फेकता कामा नये हा डाव खेळण्यात पाच ते सात मिनिटे वेळ मिळेल. खेळ संपताना ज्या गटाचे गुन जास्त होतील तो गट विजयी ठरेल.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या