देणारे हात
जे का रंजले गांजलेत्यासी म्हणे जो आपुले
तोचि साधू ओळखावा
देव तेथेची जाणावा
या वचनाप्रमाणे साधुत्वाच्या खुणा नरेंद्रच्या अंगी अगदी बालपणापासूनच होत्या. दुखी प्राणी गोरगरीब लोकांना पाहिले की त्यांच्या हृदयातल्या माणूसकीला प्रेमाचा पाझर फुटत असे.
अशा लोकांना जी काही मदत करता येईल ती करावी त्यांच्या अश्रूंची फुले करावीत त्यांना सहकार्य द्यावे तहानलेल्यांना पाणी भुकेल्याला अन्न उघड्या नागड्या ला अंग झाकायला वस्त्र द्यावे याकडे नरेंद्र चा ओढा फार होता. आपल्या घासातला घास दुसऱ्या भुकेलेल्या घालायचा तृप्तीचा आनंद त्याच्या डोळ्यात पाहायचा हाताला येईल ती वस्तू मागचा-पुढचा कोणाचाही विचार न करता समोरच्या याचकाला देऊन टाकायची.प्रसंगी आपल्या अंगावरचे वस्त्र ही दुसऱ्याला द्यायचे ह्या अशा साधुसंतांच्या गोष्टी करण्यात नरेंद्रला नेहमीच धन्यता वाटे आनंदही वाटे.
नरेंद्रने आपल्या अंगावरचा नवाकोरा सदरा असाच कोणाला तरी असा देऊन टाकला.त्या दिवसापासून या पोराचा काही भरवसा नाही उद्या एखाद्याला घरातली एखाद्या मौल्यवान वस्तू देऊन टाकायला मागेपुढे पाहत नाही. त्यापेक्षा आपणच आता काहीतरी उपाय शोधायला हवा करायला हवा.असा विचार करून भुवनेश्वरी देवी ने नरेंद्रला मांडीवरच्याखोलीत कोंडून ठेवले.
नरेंद्र चे मन दयाळू होते त्यांचा हात देण्यासाठी नेहमीच सरळ होता समाजातील गोरगरीब दुःखी पीडित दिन दुर्बल अपंग आजारी अशा लोकांना त्यांची देणारे हात कधी कधी वस्त्र कधी पैसे तर कधी प्रेम आधार देत.दानाची वृत्ती नरेंद्रच्या मनात बालपनापासूनच सक्रीय होती.
आणि म्हणूनच की काय नरेंद्राने संन्यास घेऊन आपले सारे जीवनच या समाजकार्याला अर्पण करून टाकले एकदा छोट्या नरेंद्रला त्याच्या आईने वरच्या खोलीत कोंडून ठेवले होते ते आता रोजच होते रोजचेच होते नरेंद्र कसल्यातरी खेळात रमला होता तोच त्याच्या कानावर एक भजनाची धून आली धावत खिडकीपाशी आला त्यांनी खाली डोकावून पाहिले तर काय एक पंधरा वीस साधू वैराग्याचा जथा रस्त्याने चालला होता. बैरागी मुखाने देवाचे भजनकरीत चालले होते पण त्यांची नजर मात्र पुन्हा दारा खिडकीत माडीवर कोणी काही देणार दाता दिसतोय का म्हणून शोध घेत होती. देवाचे नाव घेत आकाशाकडे पाहणाऱ्या आणि देणार आहात शोधणाऱ्या त्या जागेला खिडकीत उभा राहून वैराग्याच्या ज्याच्याकडे पाहणारा नरेंद्र दिसला हातात येईल ते दे बैराग्यांची झोळी भर.
आशीर्वाद घे दुवा घे गरिबाला काहीतरी दे रे बाळा नरेंद्र नरेंद्र खाली बोलावले आणि आता त्या जागेला नेमकं काय द्यायचं याचा नरेंद्र विचार करू लागला कारण तिथे त्या माडीवरच्या खोलीत आपण त्या आहे त्याला काहीतरी द्यायला हवं पण काय विचार करीत असताना त्याला पलंगावर शाल दिसली.खरंतर ती त्याच्या वडिलांची होती पण क्षणाचाही विचार न करता नरेंद्रने शालीची घडी वैराग्याच्या हातात टाकून दिली .नरेंद्र चे फक्त देणारेच आहात ते त्यांना फक्त द्यायचं आणि देतच राहायचं एवढंच माहीत होतं
0 टिप्पण्या