खो खो खेळण्यासाठी पूरक व्यायाम:


 खो खो खेळण्यासाठी पूरक व्यायाम:

१)शटल पद्धतीत धावणे:
खुंटाजवळ उभे रहा. पहिल्या आडव्या पाटी पर्यंत धावत जा, परत या, खुंटाला वळसा घाला, परत धावा. आता दुसऱ्या पाटी पर्यंत धावत जाऊन परत या. खुंटाला वळसा घाला. परत धावा. आता तिसऱ्या आडव्या पाटीपर्यंत...... अशाप्रकारे शेवटच्या आडव्या पाटीपर्यंतचे शटलपद्धतीचे धावणे पूर्ण करा.



२)धावता-धावता दिशा बदलणे:
मोकळ्या मैदानात उभे रहा. शिक्षक आपल्या डाव्या हाताने जी दिशा दाखवतील त्या दिशेकडे धावत जा. काही क्षणानंतर शिक्षक शिट्टी वाजवतील, तेव्हाच डाव्या हाताने धावण्याची नवी दिशा दाखवतील. अशाप्रकारे प्रत्येक वेळेस शिट्टीच्या इशाऱ्यावर शिक्षकांच्या डाव्या हाताने दाखवलेल्या नवीन दिशेकडे धावत रहा. त्यासाठी तुम्हाला कधी सरळ धावता-धावता अचानक कधी डावीकडे कधी उजवीकडे दिशा बदलत धावावे लागेल.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या