कांगारू उडी शर्यत प्रत्येकी चार चार विद्यार्थ्यांचे गट करा. आरंभ रेषा व आरंभ रेषेला समांतर 10 मीटर अंतरावर अंतिम रेषा आखा. आरंभ रेषा व अंतिम रेषा यामध्ये चार-पाच धावपट्ट्या आखा. आरंभ रेषेवर प्रत्येक गटातील चारही विद्यार्थी एकामागे एक असे रांगेत उभे राहतील.
प्रत्येक गटातील पहिल्या विद्यार्थ्याकडे फुटबॉल किंवा व्हॉलीबॉलचा चेंडू असेल. शिक्षकांनी शिट्टी वाजवताच पहिल्या विद्यार्थ्यांनी दोन्ही मांड्यामध्ये चेंडू पकडावा व हाताचा आधार न घेता उड्या मारत मारत अंतिम रेषेला स्पर्श करावा. त्यानंतर चेंडू हातात धरून परत आरंभरेषेकडे धावत यावे.आणि आरंभरेषेवरील आपल्या गटातील विद्यार्थ्यांना चेंडू द्यावा.
चेंडू मिळालेल्या विद्यार्थ्यांने आधीच्या विद्यार्थ्याप्रमाणे आरंभरेषेवर परत जावे.ज्या गटातील चौथा विद्यार्थी आरंभरेषेवर आधी येईल तो विजेता असेल.उड्या मारताना मांड्यामधुन चेंडू पडल्यास तुम्ही असाल तिथे थांबून चेंडू पुन्हा मांड्यामध्ये पकडा आणि पुन्हा उड्या मारायला सुरुवात करा.
0 टिप्पण्या