साने गुरुजी यांचा जीवन परिचय


 साने गुरुजी 

बाल दोस्तांनो आज मी तुम्हाला एका गमाड्या गमंतीकडे घेऊन जाणार आहे.ओळखा बरं ओळखता येईल का तुम्हाला ! नाही ना ? तर मग चला पहा ती गम्माडी गमंत काय आहे ती !
बालदोस्तांनो कोकण, हे नाव तर तुम्ही नक्कीच ऐकलं असणार नाही का ? अरे हो इयत्ता चौथी च्या मुलांना तर नक्कीच पाठ असेल कारण त्यांच्या भूगोलाच्या पुस्तकातच महाराष्ट्राच्या स्वाभाविक विभाग कोकण हा महाराष्ट्राचा स्वाभाविक विभाग आहे.असं नमूद केलेल आहे. कोकण म्हटलं की हिरवी हिरवी वनराई आणि नारळी पोफळीची झाडं आपल्या डोळ्यापुढे उभी राहतात नाही का आणि हो आंब्यांचा राजा हापूस आंबा सुद्धा कोकणातला सर्वांग सुंदर कोकण कोणाला बरे लळा लागणार नाही.आणि त्यातल्या त्यात नररत्नाच्या या कोकणाने दिव्यराष्ट्रपुरुषांनाही आपल्या अंगाखांद्यावर खेळवलं आहे. तेव्हा त्यातल्याच एका राष्ट्रपुरुषांविषयी आपण माहिती करून घेणार आहोत.
रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यात दिनांक २४ डिसेंबर १८९९ रोजी एक बालक जन्माला आले.तो सुवर्ण दिनच म्हणावा लागेल कारण त्या बालकाचा नाव पांडुरंग असं होतं तेच प्रतापी नाव साने गुरुजी या नावाने आज साऱ्या जगाला परिचित झालेलं आहे. या बाळ पांडुरंगाच्या आईचे नाव यशोदा असे होते.वडिलांचे नाव सदाशिव असे होते. पांडुरंगाच्या घरी अठराविश्व दारिद्र्य होते. त्यांची आई यशोदाबाई अतिशय प्रेमळ व सात्विक होती. गुरुजींचे वडील सदाशिवराव करड्या शिस्तीचे असले तरी त्यांची आपल्या मुलांवर अतिशय माया होती.
पांडुरंग आपल्या आई-वडिलांच्या मायेच्या छताखाली हळूहळू वाढू लागला घरची गरिबी यामुळे कुटुंबाच्या खाण्यापिण्याची आबाळ होईल तेव्हा पांडुरंगाची आई अर्धी कोर भाकरी पांडुरंग व त्यांच्या भावंडात वाटून देऊन ती उपाशीच राही. आपल्या आईचे हे अस्सल भूतदयावादी संस्कार घेऊन पांडुरंग खोताच्या घरात वाढला होता. त्यातच वडील सदाशिवराव हे देशभक्त त्यांना स्वातंत्र्य चळवळीत तुरुंगवास भोगावा लागला.पांडुरंगाला शिक्षणासाठी पुणे मुंबई येथे राहावे लागले. चिकाटी व जिद्द बाळगून पांडुरंग शिकत होता अशा खडतर प्रवासात कधी माधुकरी मागून तर कधी वार लावून तर कधी पाण्यावरच भूक भागवून पांडुरंगाचे ज्ञानाचे धडे गिरवत होता.कधी मामाकडे तर कधी आत्याकडे पांडुरंगाची शिक्षणासाठी रवानगी होई. त्या ठिकाणी त्याला अनेक अडली पडली कामे करावी लागत होती.ती तो निसंकोच करी.त्याच्यावर त्याच्या आईने चांगले संस्कार केलेले होते.
एकदा अशीच गंमत घडली नित्याप्रमाणे पांडुरंग सकाळी लवकर उठला प्रातर्विधी मुखमार्जन करून नेहमीप्रमाणे तो आईबरोबर जात्यावर बसला आणि त्याने आईबरोबर दळून काढलं.आई बरोबर त्यांना ओव्या त्याच्या सुरात सूर मिसळून मोठ्या मोजणे तो ओव्या गाऊन आईच्या कामात तिला मदत करी. दळण संपले आणि यशोदा बाईंनी स्नानासाठी पाणी तापवले नंतर लगेचच त्यांनी पांडुरंगाला आंघोळीसाठी हाक दिली पांडुरंग धावतच आत आला.
त्याने अंगावरील कपडे काढले आणि तो तिच्या पुढ्यात उभा राहिला. आईने पांडुरंगाला आंघोळ घातली हातांचा स्पर्श पांडुरंगाला सुखात व आल्हादकारक वाटला या ममताभरल्या हातांनी कितीही वेळ अशीच आंघोळ आपणास घालत राहावी असं त्या बालमनाला वाटत राहिलं. तो चिमुकला पांडुरंग टोपल्यात पाण्याची चाळे करत आणखी एक चरवी अंगावर असं म्हणत यशोदा बाईंना भंडावत होता. म्हणून त्याने चक्क चार पाच चरव्या गरम गरम पाणी अंगावर ओतून घेतले.तेव्हा कुठे त्या त्याचं समाधान झालं.शेवटी आईने आपल्या लुगड्याच्या पदराने त्याच अंग पुसून कोरडे केलं पण हट्टी पांडुरंग आईला म्हणाला.आये तु वेंधळी का ग ! त्यावर यशोदाबाई त्याच्याकडे पाहातच राहिल्या आईकडे पाहात पांडुरंग म्हणाला अगं तू माझं सारं अंग पदराने पुसून स्वच्छ केलं पण पायाला ही माती लागली ती नाही पुसलीस. पांडुरंगाचे हे ऐकून यशोदाबाई ऐकून हसल्या याची पांडुरंगाला गंमत वाटली आणि तो म्हणाला आई तु का हसतेस गं.
त्यावर यशोदाबाई म्हणाल्या पंढरी पायाच्या तळव्यांना घान लागली म्हणून जपतोस त्यापेक्षा मनाला घाण लागणार नाही याला जप. आईच्या या वाक्याचं साने गुरुजींनी आयुष्यभर पालन केलं. लहानपणापासूनच पांडुरंग पोथी किर्तन भजन ऐकून त्याचं मनन पठण करी. यशोदाबाई त्यांच्या बालमनावर थोरामोठ्यांच्या जीवनातील चांगल्या गोष्टी सांगून संस्कार करीत. आपल्या दारिद्र्यातही समाधान मानून पांडुरंगावर संस्कार करणारी यशोदाबाई खरोखरच एक आदर्श माता तर होतीच परंतु ती आदर्श गृहिणी व पत्नी होती.
एकदाचा असाच एक प्रसंग आहे घरात अठरा विश्व दारिद्र्य आलेला दिवस त्याही स्थितीत ही माऊली समाधानानं सर्वांना कोंड्याचा मांडा करून खाऊ घाली.कधी-कधी तर ती पाण्यावर आपली भूक भागवी. अशात दिवाळसण तोंडावर आलेला दिवाळी म्हटलं की अभ्यंगस्नान गोडधोड खायला फटाके वाजवायला या साऱ्याच गोष्टी आल्या. तेव्हा सदाशिवरावांनी कर्ज काढून आपल्या मुलांसाठी नवीन सदरे शिवले. आपण तर आयुष्यभर या जुनेर त्यातच काढतोय लेकरांना तरी नवी घ्यावी या हेतूने सदाशिवराव यांनी मुलांना नवे कपडे शिवले.लेकरांच्या अंगावरील कपडे त्यांनी डोळा भरून पाहिली त्यांना कोण आनंद झाला यशोदाबाईनांहीआनंद झाला.पण त्याचे मन आतल्या आत कुरतडत होते कारण सदाशिवरावही जीर्ण व फाटके धोतर नेसून दिवाळीचा सण साजरा करत होते. त्यातच एके दिवशी आईच्या भावाकडून भाऊबीजेची तीन रुपये ओवाळणी आली लगेच त्यांनी त्यातून सदाशिव रावांसाठी एक पान खरेदी केलं दिवाळीत स्नान केल्यानंतर सदाशिवराव आपला जुना फाटका धोतर शोधू लागले. पण त्यांना ते काही सापडेना तेव्हा यशोदाबाई पुढे आल्या आणि त्यांनी त्यांच्या हातात धोतराचं नवं पान दिलं. तेव्हा सदाशिव रावांना गहिवरून आलं त्यांचा कंठ दाटून आला. ते दाटल्या कंठाने म्हणाले. यशोदे अगं तूच एखादं लुगड घ्यायचं होतीस. तुझही लुगडं किती पाठवून चिंद्या झालंय.
बालदोस्तांनो अशा आईवडिलांच्या पोटी जन्मलेला पांडुरंग खरोखरच वात्सल्याचा महामेरूच होता.आई वडिलांची हे अभूतपूर्व संस्कार पांडुरंगाच्या मनावर खोलवर रुजले आणि म्हणूनच त्याने आपल्या आयुष्यात अशी अभूतपूर्व आणि मनाला मोहून टाकणारी कविता केली.
खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे.
पांडुरंगावर त्यांच्या आईचे संस्कार तर होतेच परंतु आदर्शवादी व ममत्त्व जपणाऱ्या वडिलांचे ही संस्कार होते. आई-वडिलांच्या प्रेमात मनसोक्त न्हाऊन निघालेल्या पांडुरंगाच्या जीवनात शिकत असताना एक अभूतपूर्व प्रसंग घडला. बाल दोस्तांनो आई म्हटलं की आपल्या मायेची आणि खाऊच माहेर घर नाही का ? आई रागावते व लगेच माया ही करते. आपण खरे तर आईच्या भोवतीच घुटमळतो.तसाच पांडुरंग ही आईच्या भोवतीच अधिकतर घुटमळायचा पांडुरंगाचे वडील सदाशिवराव तसे करारी स्वभावाचे.
घरचे अठराविश्व दारिद्र्य त्यात आई देवधर्माची पूजा करणारी साध्वी स्त्री. तर वडील स्वातंत्र्याच्या चळवळीत उतरलेले देशभक्त कार्यकर्ते.म्हणूनच तर पांडुरंगाला देवभक्ती व देशभक्तीचं अभूतपूर्व वेड लागलं होतं. याचाच पांडुरंगाने आपल्या पुढील आयुष्यात साने गुरुजी या नावाने आपला परिचय जगाला करून दिला. दापोलीच्या मिशन मध्ये शिकत असतानाच्या पूर्वीची गोष्ट.पांडुरंग अभ्यासात जास्त हुशार होता तसा कविता लिहिण्यात ही कुशल होता पुण्यात व मुंबईला मामाकडे राहून शिकत असताना त्याला खूप त्रास सहन करावा लागला.शेवटी त्याने त्या त्रासातून आपली मुक्तता करून घेतली.पण शेवटी मुंबईहून त्याला पुण्याच्या मामाकडे परत पाठवण्यात आले. त्याने तेथेच राहण्याची निश्चिय केला. तेथे दुपारच्या वेळात भक्तिविजय हरिविजय ग्रंथ बाया-बापड्यांना आपल्या रसाळ वाणीने वाचून दाखवी त्यांच्या अर्थ समजावून सांगे.त्यामुळे तेथील भोळ्याभाबड्या बायकांचा लाडका बनला तो सर्वांना आपलाच वाटू लागला.त्या बाया त्याच्याकडून छोटी-मोठी कामे करून घेऊ लागल्या पण त्यांच्या घरचे हिशेबही त्याच्याकडून करवून घेत. एवढं करत करत पांडुरंग वेळ काढून तुळशी बागेत जाऊन राम नामाचा जप करू लागला. तो अशा अवस्थेत असतानाही मामाचा जाच चालूच होता की त्याने कंटाळून पुणे सोडलं व आपल्या गावी पालगडला आला नंतर दापोलीस आत्याकडे शाळेतील शिक्षणास गेला.
दापोलीस मिशन हायस्कूलमध्ये त्याचे नाव दिनांक 10 जून 1912 रोजी घातले. शाळा निसर्गाच्या सानिध्यात होती तो या शाळेच्या वातावरणात चांगलाच रमला त्या शाळेतील शिक्षकवृंदही अतिशय चांगले होते. या काळात चांगले मित्र मिळाले त्याच्या सानिध्यात तो अतिशय मोकळ्या मनाने रमला.तो मित्रासोबत वेगवेगळे खेळ खेळे त्यातच कोडी सोडविणे भेंड्या लावणे यासारखे खेळ मित्रासोबत खेळी या वातावरणातच त्याचा कवितेकडे अधिक ओढा लागला कविताही करू लागला. अशी काव्यात्मकता जोपासत पांडुरंग इंग्रजी पाचवी इयत्ता पास झाला.एके दिवशी अशीच शाळेची मधली सुट्टी झाली मुलं आपापल्या खेळात दंगली पांडुरंग काही मित्रांच्या घोळक्यात बसून कवितेच्या भेंड्या लावीत होता. इतक्यात पांडुरंगाचा एक मित्र त्याच्याकडे धावत पळत आला. आणि म्हणाला अरे तुझ्याकडे कोणीतरी एक म्हातारी व्यक्ती आली आहे.आणि बऱ्याच वेळापासून ती बाहेर फाटकाशी उभी आहे.ती तुझी चौकशी करत आहे. की आता इकडे यायला लागली आहे.असा पांडुरंग जागेवरून उठला आणि येणाऱ्या व्यक्ती कडे निरखून पाहू लागला. तर त्याचे वडील होते. त्याचे ते काळसर फाटके धोतर अंगरखा उपकरणे आणि डोक्यावर तो अस्ताव्यस्त रुमाल, वाढलेले दाढीचे केस, एकंदरीत कैद्याच्या वेषागतच त्यांचा अवतार झालेला होता.आपल्या वडिलांना पाहून पांडुरंग कष्टी झाला.सदाशिवराव पांडुरंगाच्या जवळ आले. त्यांनी आपल्या फाटक्या उपरण्यातील खाऊचा एक डबा बाहेर काढला.पांडुरंगा पुढे देत ते प्रेमळआवाजात म्हणाले. पंढरी तुझ्या आईने मोठ्या प्रेमाने आपल्या कपिला गायीच्या दुधाचा खरवस तुला पाठवला आहे. तेव्हा तो खरवस तू आणि तुझे मित्र मिळून खा.आणि मन लावून अभ्यास कर बरं का मी निघतो आता.त्यांनी पांडुरंगाच्या पाठीवरून मायेचा हात फिरवला आणि कमरेच्या गाठी तरी एक पावली काढून त्याच्या हातात घेऊन म्हणाली ही असू दे तुझ्याकडे गावातून येता येता वाण्याकडून ऊधारी ने घेतली आहे. सांभाळून ठेव कधी काही अडचण आली तर. ति मोड. वडिलांच्या मायेने पांडुरंगाला गदगदून आलं.
आपली आई आणि वडील आपल्यासाठी किती कष्ट उपसतात आपल्यावर किती माया लावतात हे पाहत त्याचे मन भरून आलं. वडिलांच्या पाठमोऱ्या आकृतीकडे तो एकटक पाहात राहिला.आपल्या वडिलांचं विराट दर्शन त्याच्या डोळ्यापुढे उभं राहिलं आपल्या मित्राच्या वडिलांची वेशभूषा आणि आपल्या वडिलांनी त्यांच्या घरच्या कपड्यातील अवताराची थोड्या वेळापुर्वी त्याला वाटणारी लाज कुठल्या कुठे पळून गेली. आपले वडील एक दिव्य पुरुष आहेत असं त्याचं मन त्याला सांगू लागलं.इतर मित्रांचे वडील येतात त्यांना एका बाजूला बोलावून खाऊ देऊन गुपचूप निघून जातात.परंतु आपले बाबा पैशाने श्रीमंत नसतीलही पण मनाने श्रीमंत आहेत.याचं दर्शन पांडुरंगाला आज झालं.आईने दिलेला दुधाचा खरवस बाबांनी सर्वांना वाटण्याचा सांगितला बाबा किती मोठ्या मनाचे आहेत.त्याचं आपल्या इतकच इतरांवरही प्रेम आहे.याचा पांडुरंगाला आनंद झाला. थोडा वेळ तो पितृ भक्तीच्या अमृत डोहात बुडून गेला.
पांडुरंगाच्या बालपणी त्याच्या मनावर एवढ्या गरिबीत राहूनही यशोदाबाई ने चांगले संस्कार रुजवले होते.पांडुरंग आपल्या आईवडिलांनी इतकीच माया आपल्या भावंडांवर आहे तरी तसे कधी खाऊ ला पैसे मिळाले तर तो शाळेतील मुलांसोबत खाऊ विकत घेऊन खायचा नाही काहीतरी निमित्त सांगून तो पुस्तक वाचत बसायचा तसेच कधीकधी मिळालेले खाऊचे एक रुपया दोन आणे त्यांनी जमा करून ठेवले आणि त्या पैशातून त्याने कोट खरेदी केला गणेशोत्सव जवळ आला होता.पावसाने फेर धरला होता. नद्या नाले एक झाले होते. अशाही अवस्थेत पांडुरंग धोधो पावसात नद्या-नाले पायी ओलांडून घरी आला. काखेतील पिशवी त्याने खुंटीला अडकवली हातपाय धुऊन घेतले अंगावरील कपडे उतरवले आणि दुसरे कपडे घातले आईला हसत हसत म्हणाला.आई मनाला घाण लागू देणार नाही बरं का.अन डोकं कोरडं करू लागला.पांडुरंगांनं खुंटीची पिशवी जवळ घेतली आणि भावाला जवळ घेऊन त्याच्या अंगावर आणलेला नवा कोट चढविला. सारे घर आनंदाने बेभान झालं. या गरीबीतली गोडी अविट होती.त्यागाच्या श्रीमंतीचे हे बळ पांडुरंगाला आयुष्यभर पुरलं.तर या मायेच्या संपत्ती ना त्याच्या प्राणीमात्रावर दया कशी करावी हे जगाला दाखवून दिलं.
पांडुरंग सत्शील आणि गुणी मुलगा म्हणून सर्वांना परिचित होता. आपल्या आईवडिलांची तो मनोभावे सेवा करीत शेजारी-पाजारी यांची कामे करी. प्राणीमात्रावर दया करी.एकदा अशीच एक गोष्ट घडली पांडुरंगाच्या घरासमोरून एक कपूत म्हातारी जाळणाची मोळी घेऊन जात होती.रस्त्याने जाता जाता तिच्या हातातील काठी त्याबरोबर त्या म्हातारीचा तोल जाऊन ती जमिनीवर कोसळली तिच्या डोक्यावरची लाकडांची मोळी ही बाजूला पडली तशाच अवस्थेत ती म्हातारी धडपडत पुढे जाण्याचा प्रयत्न करू लागली. कळ उठली ती पाण्याची याचना करू लागली तिला पाणी देण्यास कोणीच तयार होईना. तेव्हा ती मोळी उचलण्याचा प्रयत्न करू लागली. परंतु ते सारे तिला मार लागल्यामुळे तिच्या घशाला कोरड पडली होती. तिने भोवताली जमलेल्या लोकांना मोळी उचलून देण्यासाठी मदत करावी म्हणून विनवणी केली परंतु तिला मोळी उचलून देण्यासाठी कोणीच तयार होईना.कारण की म्हातारी होती अस्पृश्य असल्यामुळे तिला शिवायला कोणी तयार नव्हते.पांडुरंगा चं घर जवळच होतं त्यांना हा सर्व प्रकार पाहिला तो धावतच तिथे आला. त्याला त्या म्हातारीला पाणी पाजलं आणि तिला हाताला धरून आधार देत उभे केले.म्हातारीला चांगलीच तरतरी आणि पांडुरंग म्हातारीच्या हातात तिची काठी दिली.आणि दोन्ही हातांचा आधार देऊन तिच्या डोक्यावर ती लाकडांची मोळी उचलून दिली.आपल्या मुलाचे हे रूप यशोदाबाई आपल्या दारातून पाहत होत्या त्यांच्या आनंदाला पारावर राहिला नाही.त्यांना कृतार्थ वाटलं परंतु अगदी जमलेल्या बऱ्याच लोकांना हे आवडलं नाही. ते कुरूबुरु लागले. त्यातील काही टवाळखोर मंडळी पांडुरंगाला शिव्याशाप देऊ लागले.
अस्पृश्य बाईला शिवलास. तू धर्म बुडवीलास.असे काहीबाही जो तो बोलू लागला. परंतु पांडुरंग काही कच्च्या गुरुचा चेला नव्हता त्याच्या आईने साधुसंतांच्या गोष्टी सांगून त्याच्या मनावर चांगले संस्कार रुजविले होते. तेव्हा पांडुरंग त्या पोरांना म्हणाला ठीक आहे भावांनो मी धर्म बुडवला पण तुम्ही तर जुगार खेळता, अपेय पिता अभक्ष्य भक्षण करता. त्यापेक्षा मी तर त्या गरीब पण आपल्यासारखे अवयव असलेल्या दमलेल्या थकलेल्या जीवाला मदत केली. त्याच्यामुळे धर्म बुडत असेल तर माझी हरकत नाही. संत एकनाथांनी वाळवंटात महाराच्या मुलाचे पाय पोळत असताना त्याला कडेवर घेतलं. एवढ्या मोठ्या महात्म्याने स्पृश्य-अस्पृश्य भेद केला नाही. काशी रामेश्वराची यात्रा तर जवळ असलेलं कमंडलूतील पाणी यांनी तहानेने व्याकूळ झालेल्या गाढवाला पाजून त्याचा प्राण वाचविला. तेव्हा त्यांनी परमेश्वर सर्वच प्राणीमात्रांना जवळ वास करून असतो असे सांगितले. तेव्हा बाबांनो मी जर त्या म्हातारीला मदत केली असेल तर जरुर मी आपल्या चांगलं वाटेल ते करणारच.
पांडुरंगाच्या जीवनातील असे कितीतरी प्रसंग त्याच्या भूतदयेचा संदेश देऊन जातात. पांडुरंग जसा मोठा होत जात होता तस तसा म्हणून चिंतनात त्याचा वेळ जाऊ लागला. 1918 साली तो 50 टक्के गुण घेऊन मॅट्रिकची परीक्षा पास झाला.पांडुरंगाचं कौतुक करायला त्याची आई नव्हती. दोन नोव्हेंबर 1970 आला यशोदाबाई स्वर्गवासी झाल्यावर त्या 1918 ते 1922 या चार वर्षात पांडुरंग पुणे कॉलेजमध्ये विद्येची साधना करू लागला.कॉलेजमध्ये असताना तो विविध विषयांचा अभ्यास करू लागला. त्यातच 15 नोव्हेंबर 1924 रोजी वडिलांचे निधन झाले. पांडुरंगाची वडिलांचे छत्र नाहीशे झाले.
1924 सली पांडुरंग मुंबई विद्यापीठाचा एम ए झाला. दुसऱ्या वर्गात पास झाला विद्यार्जन संपली आणि पांडुरंगाने अमळनेरला प्रताप हायस्कूलमध्ये शिक्षकाची नोकरी पत्करली.पांडुरंगाचा पांडुरंग सदाशिव साने उर्फ साने गुरुजी म्हणून लौकिक झाला. वेगवेगळ्या विषयावर अभ्यासपूर्ण लेखन घटक या शिवाय विद्यार्थी सारखे व साधने सारख्या मासिकातून आपले व इतरांचे चांगले विचार लोकांपर्यंत पोहोचविण्याची पवित्र कार्य हाती घेतले. स्वातंत्र्याच्या लढ्यात स्वतःला झोकून देऊन गुरुजींनी आपल्या जीवनातील सत्य अहिंसा व समतेचा गांधी बाबांच्या ही सूत्रे चा प्रसार व प्रचार करून जनजागृती केली.या महात्म्याने खूप सोसलं खूप बदललं मुलांसाठी संस्कारक्षम लेखन केलं.
करी मनोरंजन जो मुलांचे जडेल नाते प्रभूशी तयांचे.
असे म्हणत...
मुलेही बागेतील निरागस फुलेच असतात.
हा गुरुजींचा संदेश आजही मनावर सतत मोरपिसाचा हळूवार फिरत राहतो. अशा या थोर पुण्यात्मानं 11 जून 1950 रोजी आपला देह ठेवला.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या