प्रसाद विश्वनाथाचा


 प्रसाद विश्वनाथाचा

खरोखरच सारं देहभान विसरून पाहत रहावे असे ते एक आगळेवेगळे प्रभावी व्यक्तिमत्व अंगी मस्तकावर फेटा तोही भगव्या रंगाचा ,शांत प्रसन्न धीर-गंभीर प्रभावी भावमुद्रा विलक्षण तेजस्वी डोळे चेहऱ्यावर ज्ञान बुद्धी वैराग्य ह्याची आगळी वेगळीच झळाळी.
उभे राहण्याची एक खास पद्धत एक पाय थोडासा पुढे तिरकी नजर हाताची घडी असं एक भव्य-दिव्य व्यक्तिमत्व नजरेसमोर पाहिलं की कोणी भारतीय चे तत्व प्रभावित होतं माथा नतमस्तक होतो आणि त्यांच्या ओठावर एकच नाव येतं स्वामी विवेकानंद या भव्य दिव्य आणि अवघ्या विश्वाला वंदनीय असणाऱ्या व्यक्तिमत्त्वाचं जन्म या भारत भूमीत झाला आहे हे माझं बाळ आहे हे सांगताना खरोखर भारतमातेला ही केवढा आनंद होत असेल. नाही का ?
भारत आणि भारतीय तत्त्वज्ञान यांचे हिंदु धर्माचे नाव जगभर प्रसिद्ध करणाऱ्या आणि गाजवणाऱ्या या थोर सुपुत्राचा जन्म १२जानेवारी १८५३ या दिवशी कलकत्ता या शहरात श्री विश्वनाथ बाबू दत्त आणि त्यांच्या धर्मपत्नी भुवनेश्वरी देवी यांच्या पोटी झाला.
श्री विश्वनाथ बाबू दत्त हे कलकत्ता येथील नामांकित कायदेपंडित.फारसी आणि इंग्रजी या दोन्ही भाषांवर त्यांचे खास प्रभुत्व होते. त्यांचा स्वभाव शांत गंभीर बोलणे पण मोजकेच पण तेही सडेतोड आणि मुद्देसूद.
एक नावाजलेले वकील म्हणून त्यांचा पंचक्रोशी मध्ये लौकिक होता. परिस्थिती ने सुद्धा चांगले होते त्यांच्याकडे कामानिमित्ताने येणारी व्यक्ती गरीब असो वा श्रीमंत प्रत्येकाचं काम ते अगदी मनापासून व प्रामाणिक पणाने करीत. सरस्वती आणि लक्ष्मी चा एक अनोखा संगम त्यांच्या जीवनात होता. विश्वनाथ बाबू दत्त यांना गोरगरीब अनाथ अपंग यांच्याबद्दल कणव होती. अशा गरजूंना ते आपल्या कमाईतील बराचसा वाटा मोठ्या आनंदाने राजीखुशीने देत असत. त्यांच्या विद्ववतेला उदारतेची साथ या ठिकाणी लाभली असावी.
त्यांच्या धर्मपत्नी पत्नी भुवनेश्वरी देवी या पण शांत, प्रसन्न, सात्वीक वृत्तीच्या अन सदाचरणी अणि देवभक्त पण होत्या. मात्र विश्वनाथ बाबू आणि भुवनेश्वरी देवी यांच्या जीवनात एक कमतरता होती ती म्हणजे त्यांना अपत्य म्हणजेच मुली होत्या. पण मुलगा नव्हता पुत्रासाठी ते दांपत्य आतुर होते.आणि म्हणूनच की काय जो जो कोणता उपाय उपवास उपासना सांगितली जाई ती मोठ्या श्रद्धेने करीत.
एकदा पुत्रासाठी दुःखीकष्टी होणाऱ्या माता भुवनेश्वरी देवी यांना पुन्हा एक वृद्ध अनुभवी अन् सश्रध्द महीलेने काशी यात्रेचा सल्ला दिला.
झालं भुवनेश्वरी देवी काशीक्षेत्री भगवान श्री काशी विश्वेश्वराच्या दर्शनासाठी गेल्या.तेथे नित्य गंगास्नान दर्शन मनापासून पूजा नामस्मरण इत्यादी साधना करून त्यांनी काशीविश्वेश्वला एक सुपुत्राची मागणी केली आणि....
सश्रद्ध भक्त मातेची ती रास्त मागणी भगवान आदिनाथ नाकारू शकले नाही.एके रात्री देवांनी भुवनेश्वरी देवी यांना स्वप्नात दर्शन देऊन सांगितले की माई जा तुझी मनोकामना पूर्ण होईल. एका जगदवंश अशा सुपुत्राची माता होण्याचे परमभाग्य तुला लाभणार आहे.
तो मंगल आशिर्वाद घेऊन भुवनेश्वरी देवी कलकत्त्यास परत आल्या ऋतू चक्र सुरुच होते एका शुभ दिनी त्यांना ती जाणीव झाली आणि त्या मोहरल्या.त्यावेळी त्यांना नेहमी ऋषीमुनी ,पवित्र गंगा नदी,सीमांवर यांची स्वप्न प्रदर्शने होऊ लागली.एका वेगळयाच अनुभुतीने त्या मनोमन मोहरू लागल्या.ह्या खेपेला त्यांना मिटल्या डोळ्यांपुढे तेजोवलये दिसू लागली.
दिसामासाने मातेच्या उदरात गर्भ वाढू लागला आणि मकर संक्रांतीच्या शुभमुहूर्तावर संक्रांतीच्या मंगल दिवशी भुवनेश्वरी देवी यांनी १२ जानेवारी १८५३ या दिवशी एका दिव्य बालकाला जन्म दिला.
पुत्राच्या मंगलमय आगमनानं अवघा परिवार आनंदित झाला. भगवान काशीश्वराने दिलेला स्वप्नं संकेत खरा झाला.एक चांगलासा शुभ दिवस पाहून बाळाला पाळण्यात घालण्यात आले. काशीविश्वेश्वराचा आशीर्वाद आण कृपाप्रसादाने झालेला बाळ म्हणून माता भुवनेश्वरी देवी यांनी त्यांचे नाव विरेश्वर असे ठेवले. मात्र प्रेमाने त्याला कधीकधी बिले या नावानेही हाक मारी.
विश्वनाथ बाबू हे मात्र आपल्या या पुत्राला जणू त्यांच्या भावी जीवनाचा आढावा घेऊन नराचा म्हणजेच अवघ्या मानव समाजाचा इंद्र म्हणजे देवांचा ही देव मानव म्हणून त्याला
नरेंद्र या नावानेच हाक मारीत.विरेश्वर,बिले, नरेंद्र, नरेंद्रनाथ अन् पुढे स्वामी विवेकानंद असा हा प्रवास आहे ‌.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या