घरगुती पत्र लेखन क्रमांक १


   परगावी असलेल्या आपल्या धाकट्या भावास वक्तशीरपणा चे महत्व सांगणारे पत्र लिहा.

सावता विद्यार्थी वसतीगृह,
नामा शिंपी पथ,
नाशिक 422001,
दिनांक 15 जानेवारी 2019.
चिरंजीव अशोक,
अनेक आशीर्वाद.
कालच ती.सौ.आईने पाठवलेले पत्र मिळाले. तुमच्या सर्वांची खुशाली कळल्याने बरे वाटले. मी येथे सर्वांपासून दूर एकटाच राहतो त्यामुळे तुमची खुप आठवण येते व काळजी वाटत असते.घरचे पत्र आले की खूप बरे वाटते पण कालच्या पत्रात आईने तुझ्याविषयी जे लिहिले आहे.ते वाचून मला दुःख झाले आहे. व काळजी वाटू लागली म्हणून हे पत्र खास तुझ्यासाठी लिहीत आहे.
अशोक तू हुशार आहेस पण तू अभ्यास करत नाहीस अशी आईची तक्रार आहे. अशोक तू असा का वागतोस अरे तुला माहित आहे का सर्वात महत्त्वाचे आणि मोलाची गोष्ट कोणती असेल तर ती म्हणजे वेळ. वेळ कोणासाठी व कशासाठी थांबत नाही.गेलेली वेळ कधीच परत मिळत नाही.हे पक्के लक्षात ठेव मग पश्चातापाचे माणसाच्या हातात दुसरे काहीच उरत नाही.असो आपल्याला विद्यार्थिदशेत मिळणारा वेळ फार मोलाचा आहे. त्याचा सदुपयोग केला पाहिजे मिळणारा वेळ तू उनाडक्या करण्यात घालवू नकोस. तुझा अभ्यास झाल्यावर उरलेल्या वेळात अवांतर वाचन कर अरे इंग्रजी मराठीत इतकी चांगली पुस्तके आहेत ती तू अवश्य वाच. त्यामुळे मनोरंजन होतेच पण आपल्या ज्ञानातही भर पडते. आपले व्यक्तिमत्वही विकसित होते.
मोकळ्या वेळात तू एखाद्या टंकलेखनाचा किंवा संगणकाच्या वर्गाला जा या दोन्ही गोष्टींची सध्या खूप गरज आहे. आईने लिहिले आहे की तू अलीकडे नियमितपणे व्यायाम शाळेतही जात नाहीस तेही योग्य नाही नियमित व्यायाम केल्याने शरीर सुदृढ व मन उत्साही राहते.
तेव्हा यापुढे वेळेचा चांगला उपयोग करायला शिक कोणतीही गोष्ट वक्तशीरपणा करणे फलदायी ठरते. तेव्हा तू सर्व गोष्टी वेळेवर करण्याची सवय लावून घे सर्व वडील मंडळींना साष्टांग नमस्कार छोट्यांना आशीर्वाद
तुझा,
दादा

टिप्पणी पोस्ट करा

1 टिप्पण्या