कष्टाची बरी भाजी भाकरी


 कष्टाची बरी भाजी भाकरी

स्वावलंबनाचे महत्त्व आपल्या पूर्वसुरींनी सांगून ठेवलेले आहे. गुरूगृही राहताना साऱ्या विद्यार्थ्यांना कष्ट करावे लागतात. मग त्यात कृष्ण बलराम अशा राजपुत्रांच्या ही अपवाद नव्हता.माणसाने वैज्ञानिक क्षेत्रात प्रगती केली.अनेक यंत्रांनी जीवन सुलभ केले.आणि माणूस आळशी झाला. साऱ्या गोष्टी आयत्या मिळाव्यात असे त्याला वाटू लागले.
पैशाने काहीही मिळवता येते म्हणून माणूस पैशाच्या मागे लागला आहे. तो पैसा ही कष्ट करून मिळविण्याऐवजी सहजगत्या कसा मिळेल यासाठी त्यांची धडपड चालू असते.असा हा माणूस मग पैशासाठी लाचारी स्वीकारतो. पिढ्यानपिढ्या चालत आलेल्या नितीनियमांना संस्कारांना तो बाजूला सारतो.आणि भ्रष्टाचाराला जवळ करतो.
200 वर्षापूर्वी शाहीर अनंत फंदीने आळशी माणसाला परखड शब्दात फटकारले होते. कष्टाची बरी भाजिभाकरी तूपसाखरेची चोरी नको.स्वतः कष्ट करून जी भाजी भाकरी मिळते ती कुन्हा श्रीमंताकडच्या तूपसाखरे पेक्षा हि नक्कीच गोड असते.पण आळशी माणसाला कष्ट करायला नकोत असतात. असेल माझा हरी तर देईल खाटल्यावरी अशी त्यांची वृत्ती असते. अशा या आळशी माणसाला ग दि माडगूळकर सांगतात जिथे राबती हात तेथे हरी.कवी यशवंत सांगतात खाटल्यावरी कुणास नाही देणार हरी. श्रमिकांच्या पाठीशी मात्र उभा गिरिधारी.
व्यक्तिगत जीवनात येणारा हाच अनुभव राष्ट्राच्या जीवनातही येतो.जे राष्ट्र स्वयंपूर्ण असते त्यालाच जगात मान मिळतो. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर भारतात अन्नधान्याची टंचाई होती. तेव्हा आमचे मित्र अमेरिकेसारख्या संपन्न राष्ट्रांकडे धान्याची मागणी करायला जात असे. हे लाचारांची अपमानित जिने नकोसे होते.पण आमच्या भारतीय श्रमीकांनी निश्चय केला आणि ते शेतात राबू लागले.त्यांची काळी माती ही त्यांना कामधेनू ठरली. भारतात हरितक्रांती झाली. श्वेतक्रांती होऊन पुन्हा एकदा दही दुधाची लयलूट झाली आणि मुख्य म्हणजे भारताची मान अभिमानाने ताठ झाली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या