परगावी असलेला तुमचा मित्र आजारी असल्यामुळे परीक्षेस बसू शकला नाही त्याच्या खिन्न मनाचे सात्वन करणारे पत्र लिहा
401 मधुबन अपार्टमेंट
शिवाजी पथ
कल्याण 4213
दिनांक 15 मार्च 2021
प्रिय मित्र सतीश,सप्रेम नमस्कार,
कालच तुझे बाबा माझ्या बाबांना भेटले होते.आणि त्यांच्याकडून कळाले की तुला कावीळ झाल्यामुळे तु परीक्षेला बसू शकला नाहीस तू आजारी आहेस. हे मला माहीत नव्हते.नाहीतर मी तुला भेटायला नक्की आलो असतो.
सतीश बाबा सांगत होते की परीक्षेला बसता आले नाही ही गोष्ट तू मनाला फार लावून घेतली आहेस. तू सारखा उदास राहतोस पण त्यामुळे तुझा आजार कमी न होता वाढतच चालला आहे.
अरे सतीश कोणताही आजार बरा होण्यासाठी जशी औषधांची गरज असते. तितकीच किंबहुना त्याहून अधिक रोग्याच्या मनाच्या उभारी ची आवश्यकता असते.मी लवकर बरा होणार असा निश्चय तू केलास की तू लवकर बरा होशील.
तुझी यावर्षीची परीक्षा बुडाली म्हणजे काही आकाश कोसळणार नाही. ऑक्टोंबर महिन्यात तू परीक्षेला बस आणि उत्तम यश मिळव. थोडा प्रयत्न केला तर तू गुणवत्ता यादीत ही नक्कीच येशील.पण त्यासाठी तू आधी पूर्ण बरा होणे आवश्यक आहे.काविळीच्या आजाराला पूर्ण विश्रांती हाच योग्य उपाय आहे. तू विश्रांती घेतली की लवकर बरा होशील तेव्हा सतीश तु सध्या केवळ विश्रांती घे वेळेवर नियमितपणे औषध घे परीक्षा बुडली म्हणून उदास वाटून घेऊ नकोस. तुझ्या अशा वागण्याने तुझ्या आई-बाबांना किती त्रास होत असेल याची तुला कल्पना येत नाही का ? तेव्हा आनंदी राहा माझी परीक्षा संपल्या बरोबर मी तुला भेटायला अवश्य येईन.
तुझ्या आई बाबांना साष्टांग नमस्कार.कळावे,
तुझा
मित्र अरुण.
0 टिप्पण्या