पर्वत आणि उंदीर


 पर्वत आणि उंदीर

 एकदा पर्वत आणि उंदीर यांच्यात वाद चालू होता श्रेष्ठ कोण यावर ते भांडत होते,

 पर्वत म्हणाला किती इटुकला पिटुकला प्राणी आहेस तू पण उंदीर पटकन म्हणाला मला माहीत आहे मी तुझ्या एवढा मोठा नाही. पण तू तरी कुठे माझ्या एवढ्या लहान आहेस.

 पर्वत म्हणाला मोठ्या आकाराचे फायदे खूप मोठे असतात मी आकाशातून वाहणाऱ्या ढगांना अडवू शकतो उंदीर म्हणाला तू त्या ढगांना आडवू शकतोस पण पायथ्याशी मी मोठ मोठी बिळे करतो तेव्हा तू मला अडवू शकतोस का.

 छोट्या उंदराने आपल्या चतुराईने पर्वतावर मात केली छोटा असो की मोठा प्रत्येकाला स्वतःचे महत्त्व असतेच.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या