उतारा व प्रश्नावली क्रमांक १३
शुक्रवारी मी मुंबईला गेलो, तेव्हा अगदी मजेदार गोष्ट घडली. माझी खरेदी झाल्यानंतर घराकडे परत जाण्यासाठी मी स्टेशनवर गेलो. माझी गाडी चुकली त्यामुळे पुढच्या गाडीसाठी मला एक तास थांबावे लागले. मी हॉटेलात गेलो आणि चहा व थोडी बिस्किटे घेतली आणि एका कोपऱ्यात बसलो आणि एक पुस्तक वाचू लागलो, एक माणूस आला आणि माझ्या शेजारी बसला त्याने एक बिस्किट उचलले आणि खाल्ले मी काहीच बोललो नाही. तो भुकेला असावा असे मला वाटले. त्याने आणखी एक बिस्किट उचलले तरी मी काही बोललो नाही. त्यानंतर त्याने शेवटचे बिस्कीट उचलण्यापूर्वी मी पटकन ते घेतले आणि तोंडात घातले. माझा चहा संपल्यानंतर मी उठलो तेव्हा माझी बिस्किटाची बशी टेबलावर असलेली मला आढळली.
0 टिप्पण्या