युद्धात जखमी झालेल्या सैनिकाचे आत्मकथन


 युद्धात जखमी झालेल्या सैनिकाचे आत्मकथन 

सुट्टीत वानवडी च्या लष्करी इस्पितळात आम्ही काही मित्रांनी भेट दिली.हेतू होता जखमी सैनिकांशी गप्पा गोष्टी कराव्यात त्यांचे मनोरंजन करावे. तेथे आम्हाला मेजर जयंत राय भेटली युद्धात शत्रूशी लढताना जखमी झालेले दोन्ही हात पाय प्लास्टर ने जखडलेले डोक्याला ही बँडेज होते.पण गडी खचलेला नव्हता मोठ्या उत्साहाने बोलत होते ते.
मित्रांनो नुकत्याच झालेल्या सीमेवरील कारगिल युद्धात मी जखमी झालो.माझ्याबरोबरचे काही वीर कामास आले कारण कारगिल युद्ध ही केवळ आमची फसवणूक होती.भयंकर थंडीमुळे युद्ध थांबविले असतांना शत्रूने गुपचूप हल्ला केला.आपले सैनिक प्राणपणाने लढत होते. तळहातावर जीव घेऊन ते लढले आणि विजय मिळाला.
मी जखमी झालो होतो तरी रडत होतो जिंकू किंवा मरू हाच माझा बाणा होता.त्या क्षणी मला आठवण झाली ती श्री शिवरायांची नेताजी सुभाष चंद्र बोस यांची मातृभूमीचे रक्षण हेच ध्येय फक्त डोळ्यासमोर होते आजही हेच ध्येय आहे. म्हणून या रुग्णालयात माझा जीव रमत नाही लवकर बरे होऊन मला रणभूमीत जायचे आहे. आणि शत्रूला पूर्णपणे नामोहरम करायचे आहे.
देशाच्या सीमेचे रक्षण करणे हेच आमचे कर्तव्य आहे. यासाठी वर्षानुवर्षे आम्ही आमच्या घरापासून दूर राहतो.त्याबद्दल आम्हाला खंत नसते कारण आम्हाला माहित आहे की सारा देश आमच्या मागे आहे. प्रत्येक सणाला राष्ट्रीय दिनाला आम्हाला देशाच्या कानाकोपऱ्यातून शुभेच्छा पत्रे येतात भेटी येतात थंडीच्या दिवसात आमच्या देश भगिनी स्वतः स्वेटर विणून पाठवतात.अशा या प्रेमळ भेटीमुळे लढण्याला दुप्पट बळ मिळते.
येथे मित्रांनो मी जेव्हा सैन्यात दाखल झालो तेव्हाच मला माहित होते की सैन्यातील नोकरी हे सतीचं वाण आहे सैन्यात दाखल होणाऱ्या प्रत्येकाने ते स्वीकारलेले असते कारण रणांगणावर येणारे मरण सैनिकाला चिरंजीवित्व देते.ते देशासाठी चे मरण असते मित्रांनो मला तुम्हाला एवढेच सांगायचे आहे की तुम्ही पुढे कोणत्याही क्षेत्रात काम करा कुठेही असा पण देशाला विसरू नका जयंताचे विचार ऐकून आम्ही भारावून गेलो. त्यांना तसे आश्वासन देऊन आम्ही त्यांचा निरोप घेतला.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या