दुसऱ्याच्या व्यंगाला हसू नये


 दुसऱ्याच्या व्यंगाला हसू नये

 खोडी कसलीही करावी पण ती केवळ गंमत किंवा मस्करी म्हणूनच एखाद्याच्या व्यंगावर चिडवणे अथवा त्या व्यंगाचा उल्लेख करून चार चौघात त्याचा अपमान करणे हे अयोग्यच ते सभ्यतेचे लक्षण नव्हे पण एखाद्याने असे केलेच तर ती खोडी आपल्यावरच उलटू शकते याचे भान ठेवावे.

 आपला शामराव एकदा रस्त्यावरून ऐटीत चालला होता. तेवढ्यात समोरून किरण येताना दिसली. ती थोडीशी तिरळी होती. शामरावचा स्वभाव मुळातच खवचट. त्यात तिरळे बघणारी किरण समोरून आलेली. शामराव म्हणाला काय किरण कसे काय ठीक आहे ना कुठे चाललीस आणि तुला म्हणे एका वस्तूच्या दोन वस्तू दिसतात. खरे का ? किरणच्या लक्षात आले की हा आपली खोडी करतोय. आपणाला हिनवतोय म्हणून ती म्हणाली खरे आहे रे. आता हेच बघ ना तुला दोन पाय आहेत ना पण मला मात्र तुला चार पाय असल्याचे दिसते आहे.

 तात्पर्य - दुसऱ्याच्या व्यंगाला हसू नये. त्याची थट्टा करू नये.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या