दिसते तसे नसते
एका शेतकऱ्याला नदीच्या एका किनार्यावरून दुसर्या किनार्यावर जायचे होते. त्यामुळे पाण्याला उतार कोठे आहे हे पाहण्यासाठी तो नदीच्या काठावर फिरू लागला. थोड्या वेळाने तो म्हणाला जिथे पाणी संथ वाहते तिथे तर ते फार खोल आहे. आणि जिथे पाण्याचा फार आवाज ऐकू येतो तिथे अगदी उथळ आहे.
तात्पर्य - शांत वाटणारा माणूस आतल्या गाठीचा असतो. आणि त्याच्याकडून धोका पोहोचण्याचा संभव असतो. तसा बडबड्या आणि मोकळ्या मनाच्या माणसाकडून धोका नसतो.
0 टिप्पण्या