लोभीपणाचे फळ


 लोभीपणाचे फळ

 केरळ राज्यातील एका खेड्यात कोमन नावाचा शेतकरी राहत होता.तो त्या खेड्यातील सर्वात अधिक सधन शेतकरी समजला जात होता. भरपूर शेतीवाडी, भला मोठा वाडा, गाई गुरांनी भरलेला गोठा कित्येक कोंबड्या, कितीतरी शेळ्या - मेंढ्या कशा कशाला म्हणून कमी नव्हते. खूप सुखी व समाधानी होता तो.

 एके दिवशी कोमनला त्याच्या

जिवलग मित्रांकडून हंस पक्षीण मिळाली. दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा तो त्या हंसिला पाहण्यासाठी गेला. तेव्हा त्याला आश्चर्याचा धक्का बसला. त्या हंसीने पिवळेधमक सोन्याचे अंडे घातले होते. ते अंडी त्यांनी गावातल्या सोनाराला नेऊन दाखविले. ते निखळ सोन्याचे होते. कोमन मनोमन खुश झाला.

 पुन्हा दुसऱ्या दिवशीही कोमनला हंसीने दुसरे अंडे घातलेले आढळले.

 त्याप्रमाणे एक महिना गेला. कोमनच्या मनात विचार आला ही मूर्ख पक्षीण रोज फक्त एकच अंडे का बर घालते. हिच्या पोटात निश्चितच पुष्कळ अंडी असणार तिला कापून ती सगळी अंडी एकदम नाही का मिळणार?

 दिवस उगवताच  त्याने धारदार सुरी घेतली. व त्या हंसीचे पोट चिरले. परंतु तिच्या पोटात त्याला केवळ एकच अंडे मिळाले. यानंतर कोमलला एकही सोन्याचे अंडे मिळाले नाही. कसे मिळणार कारण सोन्याची अंडे देणारी हंसी या जगात नव्हती.

 एवढी संपत्ती असूनही कोमन दुखी व समाधानी दिसू लागला.

 तात्पर्य - अति लोभीपणाचे फळ शेवटी दुःख प्राप्तीच.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या