केवळ पाठांतराने फजिती होते


 केवळ पाठांतराने फजिती होते

पांडुरंग बाजारात पोपट विकत बसला होता. त्याचे पोपट बोलके होते. प्रत्येक पोपट तो 100 रुपयांना विकत असे. एका गिर्‍हाईकाने विचारले याची किंमत एवढी का ? ती योग्य आहे ? पांडुरंग म्हणाला, हे तुम्ही त्या पोपटांनाच विचारांना त्याप्रमाणे गिर्‍हाईकाने विचारले एवढी किंमत योग्य आहे का ? पोपट म्हणाला यात काय संशय पांडुरंगाने पोपटाला विचारले मी तुला यांना विकले तर त्यांच्या घरी जाशील ना? पोपट म्हणाला यात काय संशय. हा सारा प्रकार शिवराज पाहत होता तो म्हणाला मी जर या पोपटाला प्रश्न विचारला तर तो उत्तर देईल का पांडुरंग म्हणाला जरूर अवश्य विचारा शिवराज ने विचारले तुझा मालक गिऱ्हाइकांना फसवतो का पोपट म्हणाला यात काय संशय. कारण त्या पोपटाने तेवढे एकच वाक्य पाठ केले होते.

 तात्पर्य - केवळ पाठांतराने अशी फजिती होते.म्हणून भरपूर यशासाठी अभ्यासच हवा.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या