उतारा व प्रश्नावली क्रमांक १४
एका घरातील खूप उंदीर एका मांजराने मारले. एका संध्याकाळी सर्वात वयस्कर उंदीर म्हणाला आज रात्री सर्व उंदरांनी माझ्या बिळात अवश्य यावे.या मांजरांचा बंदोबस्त कसा करायचा याबाबत आपण विचार विनिमय करू. सगळे उंदीर जमा झाले या प्रश्नाबद्दल खूप उंदिर बोलले पण नेमका मार्ग कोणाला सापडला नाही.शेवटी एक तरुण उंदीर उभा राहिला आणि म्हणाला मांजराच्या गळ्यात आपण घंटा बांधली पाहिजे.जेव्हा मांजर जवळ येईल तेव्हा आपणाला घंटा ऐकू येईल आणि आपण पळून जाऊ आणि लपू म्हणजे मांजराला आणखी उंदिर पकडता येणार नाही. वयस्कर उंदराने विचारले परंतु मांजराच्या गळ्यात घंटा कोण बांधणार. एकाही उंदराने ऊत्तर दिले नाही. त्याने वाट पाहिली परंतु तरीही कोणी सुद्धा उत्तर दिले नाही. शेवटी वयस्कर उंदीर म्हणाला सूचना करणे अवघड नसते परंतु तिची अंमलबजावणी करणे खूपच अवघड असते.
0 टिप्पण्या