अविचाराने नुकसान होते



 अविचाराने नुकसान होते 

एका गावात एक स्त्री राहत असे. त्या स्त्रीने एक मुंगूस पाळले होते. त्या मुंगूसाला व स्त्रीला परस्परांबद्दल खूप आपुलकी वाटत होती.

 एके दिवशी ती स्त्री आपल्या मुलाला पाळण्यात झोपवुन पाणी आणायला गेली. मुंगूस पाळण्याशेजारी बसले होते. इतक्यात तेथे एक साप आला तो साप पाळण्यातील मुलाला चावणार इतक्यात त्या मुंगूसाचे लक्ष त्या सापाकडे जाते आणि ते त्या सापावर झेप घेते. त्या दोघांमध्ये झुंज चालु होते त्या झुंजी मध्ये साप मरतो. मुंगूसाने त्याचे तुकडे तुकडे केलेले असतात त्यामुळे त्याच्या तोंडाला रक्त लागलेले असते.

 आता आपली मालकिन येईल व आपल्याला शाब्बासकी देईल म्हणून ते मुंगूस दरवाजात येऊन बसते. थोड्यावेळाने ती मालकीण येते मग मुंगूसाच्या तोंडाला रक्त लागलेले पाहून ती घाबरते तिला वाटते या मुंगूसाने आपल्या बाळाला खाऊन टाकले तिला राग येतो आणि ती पाण्याने भरलेली घागर त्या मुंगूसाच्या अंगावर टाकते. मुंगूस क्षणार्धात मरण पावतो. ती स्त्री आत येऊन पाहते तर काय तिचे मूल पाळण्यात व्यवस्थित झोपलेले असते. आणि खाली सापाचे तुकडे तुकडे पडलेले असतात. तेव्हा तिला कळून चुकते की मुंगूसाने आपल्या मुलाचे रक्षण केले आणि आपण उगीच गैरसमज करून घेतला ती पश्चाताप करू लागली.

 तात्पर्य - अविचाराने केलेल्या गोष्टीमुळे नेहमी नुकसानच होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या