एकीचे बळ
तामिळनाडू राज्यातील एक गोष्ट. तेथे एका मळ्यात चार बैल राहत होते. त्यांची नावे होती राम,रहिम, राजन,रविदास ते नेहमी एकत्रच खात पीत झोपत काम करीत खेळ सुद्धा एकत्र खेळत.
एकदा त्या मळ्यातील सर्व गवत संपले. एके दिवशी दुपारी चौघांनी मळा सोडला. जिकडे भरपूर गवत होते तिकडे गेले. एके दिवशी राम एकटाच चरायला गेला. जवळच घनदाट जंगल होते. अचानक एका सिंहाने त्यांच्यावर झेप घेतली. राम जीव घेऊन पळाला त्यांनी आपला प्राण कसा तरी वाचवला. नंतर बराच वेळ तो त्या भितीमुळे थरथर कापत होता.
दुसऱ्या दिवशी रहीम त्या गवताकडे परत गेला तेव्हा त्याची व सिंहाची गाठ पडली. मोठ्या युक्तीने त्यांनी आपली सुटका करून घेतली.
नंतर काही दिवसांनी राजनच्या बाबतीत हीच गोष्ट घडली. थोड्या दिवसांच्या अंतराने रविदासलाही तोच अनुभव आला. एके रात्री राम, रहीम, राजन, रविदास यांनी आपापसात चर्चा केली. दुसऱ्या दिवशी भर दुपारी ते चौघेही एकत्र जंगलाकडे गेले. सिंह तेथे होता परंतु त्याने त्याच्यावर झेप घेतली नाही. चार एकत्र असताना त्यांना मारता येणे शक्य नाही. हे जाणण्याइतका तो शहाणा होता. एकीच्या बळाचा परिणाम असा असतो.
तात्पर्य - सर्वांनी नेहमी एकजुटीने राहणे फायद्याचे ठरते.
0 टिप्पण्या