वेळेचे महत्व


 वेळेचे महत्व 

युधिष्टिर राजाच्या दरबारात कोणालाही रिकामे पाठविले जात नसे. एकदा या राजाच्या दरबारात एक भिकारी आला. तेव्हा युधिष्टर राजाने त्यास थोडी मदत करून परत पुन्हा दुसऱ्या दिवशी येण्यास सांगितले.

 हा झालेला प्रकार पाहून दरबारातील भीमाला मोठे आश्चर्य वाटले. त्याने दरबारामध्ये न्यायाची घंटा वाजविली. भीमाला पाहताच युधिष्ठीर राजा म्हणाला  तुझ्या वर कोणता अन्याय झालेला आहे. त्यावर भीम युधिष्ठिर राजाला म्हणाला की हा अन्याय माझ्यावर झालेला नसून तो या भिका-यावर झालेला आहे. तुम्ही या भिकाऱ्याला थोडी मदत करून पुन्हा उद्या येण्यास सांगितले. याचाच अर्थ असा की तुम्हाला उद्यापर्यंत आपण जगण्याची खात्री आहे.आणि उद्यापर्यंत जगण्याची खात्री नसेल तर तुम्ही त्या भिकाऱ्याला खोटे आश्वासन दिलेत. भिमाच्या या बोलण्यामुळे युधिष्टिर राजाला आपली चूक कळून आली.

 तात्पर्य - जीवन हे क्षणभंगुर आहे. त्यामुळे कोणतीही कामे त्वरित करावी.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या