उतारा व प्रश्नावली क्रमंक १०

 उतारा व प्रश्नावली क्रमंक १०



रामू एका खेडेगावात राहतो. त्याचे आजोबा शेतकरी आहेत. राजूचे वडील देखील शेतकरी आहेत. पावसाळ्यात रामू शेतावर जातो. तो आंब्याच्या झाडाखाली बसतो.कधी कधी तो एखादा पिकलेला आंबा तोडतो.आणि खातो शेतात जांभळाची झाडे देखील आहेत. रामू जेव्हा शाळेतून परततो तेव्हा तो जांभळाच्या झाडाकडे धाव घेतो. तो पिकलेली जांभळे वेचतो. ते घरी घेऊन जातो. त्याची आई ती जांभळे धुऊन  देते. आणि रामू ती खातो. 

जेंव्हा रामूला शाळा नसते. तेव्हा तो वडिलांबरोबर शेतावर जातो. तो गाईंना कुरणावर चरायला नेतो. त्याचा कुत्रा मोती हा देखील त्याच्या बरोबर जातो. मोती गवतात बागडतो. तो जोराने भुंकतो.

 जेव्हा संध्याकाळी ते घरी परततात. तो परिवारासह डाळ भात भाजी असे चविष्ट भोजन करतो. रात्रीच्या जेवणानंतर ते आंबे खातात आणि दूध पितात. ह्या परिवाराला आपले खेड्यातील जीवन फार आवडते तो एक सुखी परिवार आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या