भित्रा ससा


 भित्रा ससा

एक दिवस जंगलात एका झाडाखाली एक ससा झोपला होता. तेवढ्यात सोसाट्याचा वारा सुटला. पिकलेली झाडाची पाने भराभरा सगळीकडे खाली पडली. पान सशाच्या पाठीवर पडल्याने घाबरलेला ससा पळत सुटला व पळता पळता सगळ्यांना सांगत सुटला.

 अट्टण पडलं गट्टण पडलं आभाळ फाटलं.

 सशाची फुटली पाठ पळा रे पळा.

 सशाने म्हणलेले गाणे हरणाने ऐकले हरणही घाबरले. ते म्हणू लागले.

अट्टण  पडलं गट्टण  पडलं आभाळ फाटलं.

 सशाची फुटली पाठ पळा रे पळा.

 असे म्हणत ससा व हरण पळत सुटली वाटेत हत्ती भेटला हत्तीने विचारले कारे पळतात. ससा म्हणाला काय सांगू.

 अट्टण  पडलं गट्टण पडलं आभाळ फाटलं.

सशाची फुटली पाठ पळा रे पळा.

हत्ती  सुद्धा एवढा मोठा पण तोही पळायला लागला. असे करता करता माकड लांडगा सगळे लागले पळायला.

 वाटेत कोल्होबा  भेटला का रे पळता. ससा म्हणाला मी झोपलो होतो तिथे आभाळ फाटून माझ्या पाठीवर पडले. त्याने माझी पाठ फुटली. हे ऐकल्यावर कोलोबा हसले. दाखव रे सशा तू कुठे झोपला होतास. ससा भित्रा तो काही दाखविण्यास पुढे येईना. शेवटी सर्व प्राणी पुढे आले ससा भीतीने थरथर कापत होता. त्याने लांबूनच झाड दाखवले. तेव्हा पुन्हा सोसाट्याचा वारा सुटला भराभरा झाडाची पाने पडली. तेव्हा कोल्हा म्हणाला अरे वेड्या हे काय आभाळ फाटलं का इतर झाडांची पाने पडली वेडा रे वेडा असे म्हणून कोल्होबा जोरात हसू लागला. त्याच बरोबर सगळे प्राणी गुपचूप घरी गेले. व ससोपंत झुडपात लपून बसले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या