उतारा व प्रश्नावली क्रमांक ७


 उतारा व प्रश्नावली क्रमांक ७

नाटक किंवा सिनेमा पाहताना आपण तिथे तात्पुरते रंगुन गेलो. तरी अखेर ही सर्व खोटे आहे कृत्रिम आहे ही जाणीव मनात कायम असतेच. सर्कशीत अशा खोटेपणा ला वावच नसतो तेथील वाघ सिंह अस्सल  असतात जीवन-मरणाच्या सीमेवर चाललेला सर्कशीचा खेळ हा शंभर टक्के खरा असतो.

 सर्कशीतली मला सर्वात आवडणारी गोष्ट म्हणजे विदूषक. लाल नाक असलेला चट्यापट्याचा पोशाख चढवणारा. घोड्यावर उलटा बसणारा नी विचित्र बोलून हसवणारा विदूषक म्हणजे सर्कशीच्या विश्वातली  अजब चीज आहे. विदूषकाचे आपणास विशेष कौतुक वाटते ते यासाठी की वरवर अडाणी बावळट वाटणारा हा प्राणी पट्टीचा कसरतपटू असतो.तुम्हाला हसवता हसवता तो तुमच्या कडून कौतुकाची खंडणी वसूल करून जातो. अशा या सार्‍या गमती सर्कशी शिवाय आपणास दुसऱ्या कुठे दिसणार म्हणून मला सर्कस फार आवडते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या