झाडे नसती तर


  झाडे नसती तर

स्वतः उन्हात उभे राहून जे दुसऱ्यांना सावली देतात दुसऱ्यांसाठी फळे सुध्दा धारण करतात. ते वृक्ष जनू सतपुरुष आहेत, असे त्यांचे यथार्थ वर्णन सुभाषितकारांनी केले आहे.सर्वांना सुखावह सावली देणारी झाडे नसती तर विविध रंगाची व आकारांची पाणे नसती.सुगंधी फुले नसती . मग रसाळ फळे कुठली. मंग शंकराला बेल,गणपतीला दुर्वा, सत्यनारायणाला तुळस आणि मंगळागौरीला सोळा प्रकारची पत्री कुठून मिळाली असती.
झाडे नसती तर हापूस आंबा खायला कसा मिळाला असता. कच्ची कैरी,लालबुंद सफरचंद,डाळींब, अननस या फळाची चंगळ नसती.चाफा, मोगरा गुलाब यांचा धुंद परीमल आणि वेड लावणारे सौंदर्यच नसते.पिंपळाच्या पारावरच्या गप्पा, वडाच्या पारंब्या चा खेळ पारिजातकाचा सडा या साऱ्या गोष्टीतील मौजच हरवली असती.
आज अनेक औषधे वनस्पती पासून उपलब्ध होतात. कडुनिंबाची पाने आरोग्याची हमी देतात. तुळशी बेहडा सबजा इत्यादी औषधी वनस्पती मानवाला वरदायी आहेत. झाडे नसती तर आयुर्वेद निर्माण झाला नसता.झाडे नसती तर वार्याचे अस्तित्व कसे जाणवले असते.पाऊस आला नसता मातीची धूप थांबली नसती. चंदनाचे झाडे नसते तर वीरहारताला शीतलता आणि देवपूजेला गंध नसते. झाडे नसती तर प्रदूषणाची गंभीर समस्या निर्माण झाली असती. प्राणवायूचा पुरवठा कसा झाला असता.
झाडे नसती तर कवी मंडळी ची फार अडचण झाली असती. त्या तरुतळी विसरले गीत अशी सुंदर काव्यपंक्ती निर्माण झाली नसती. झाडे नसती तर अनेकांची संकेतस्थळे हरवली असती. ललनांनी श्रावणात झोके कोठे बांधले असते .सुगरन पक्षांनी आपला घरोटा कोठे बांधला असता. झाडे नसती तर गजराजसारख्या शाकाहारी प्राण्यांनी काय केले असते. प्रत्येक शुभप्रसंगी आंब्याची पाने घरात मांगल्य आणतात. भाजी आमटीच्या फोडणीची लज्जत कडीपत्ता वाढवतो. झाडे नसती तर माणसाच्या जीवनातील हिरवेपणा मृदुताच हरवला असता.मग चांदोबा कोठे लपला असता. हिरव्या चाफ्याचा सुगंध लपवण्याची गरज पडली नसती. रजनीगंधा धुंद झाली नसती.वृक्षाविना सर्व जीवन रूक्ष झाले असते. मानवाच्या जीवनातील प्रत्येक क्षण झाडाशी निगडित आहे की त्यामुळे माणूस आपल्या वंशावळीचा वंशवृक्ष असे सार्थ अभिधान देतो.असा हा मानवाचा थोर मित्र नसेल तर हे मानवी जीवन नष्ट होईल.
तसेच संत तुकाराम महाराजांनी झाडांना आपले सगेसोयरे म्हटलेले आहे झाड हेच आपले खरे मित्र आहेत .झाडे आपल्याला प्राणवायू व फळे इत्यादी देतात तसेच उन्हाळ्याच्या दिवसात आपल्याला सावली देखील देतात म्हणून वृक्ष हेच आपले खरे सगेसोयरे व खरे मित्र आहे म्हणून आपण सर्वांनी वृक्ष लावली पाहिजेत झाडे नसतील तर आपणही नसतो हे मात्र खरं आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या