संगणकाचे अधिराज्य


 ‌ संगणकाचे अधिराज्य 

आज संगणकाविना कोणाचेही पान हलत नाही.संगणकाचा जन्म पौर्वात्य देशात झाला चार्ल्स बॅबेज हा संगणकाचा जन्मदाता.इसवी सन 1832 मध्ये म्हणजे सुमारे दीडशे वर्षापूर्वी जन्माला आलेले हे बाळ भले भक्कम आणि मोठे होते. त्याची कार्यक्षमता ही मर्यादित होती. पण हा गुणी बाळ जसजसा मोठा होऊ लागला तसतसा त्याचा आकार अधिकाधिक लहान होत गेला.आणि कर्तृत्वाच्या कक्षा मात्र सतत रुंदावत गेल्या म्हणून तर आज हा संगणक आपले अधिराज्य सर्वत्र स्थापू शकला आहे.
एकविसावे शतक हे ज्ञानयुग आहे. आणि या विज्ञान युगाचा कळस म्हणजे संगणक. आज या संगणकाला अशक्य हा शब्द माहीत नाही. एकेकाळी संगणक ही फक्त शास्त्रज्ञांची मक्तेदारी होती.पण आज तो जनसामान्यांचा सेवेकरी झाला आहे. आपण प्रवासाला निघतो तेव्हा आपल्या प्रवासातील रेल्वेच्या व विमानाच्या तिकिटांचे आरक्षण संगणक करतो. आपल्या घरात दर महिन्याला येणारी विजेची व दूरध्वनी ची बिले विम्याचा हप्ता भरण्याची सूचना देणारी स्मरणपत्रे संगणक तयार करतो.संगणकाने सर्व कामे सोपी सुलभ आणि शिस्तीची केली आहेत.
मोठमोठ्या संस्था कारखाने कचेऱ्या येथील बिले तयार करण्यासाठी कामे संगणक करतात. शालांत परीक्षा आणि इतर अनेक मोठमोठ्या परीक्षांचे निकाल संगणक तयार करतो.मोठी पुस्तके ग्रंथ अगदी सहज चपट्या चुटकीसरशी संगणकाच्या साह्याने छापले जातात बॅंका विमा कंपन्या शेअर्स कचऱ्यामध्ये हिशोब संगणक क्षणात बिनचूक करतात.
सध्याच्या विज्ञानयुगात सतत संशोधन चालू असते. या संशोधनाला संगणक मोठे साहाय्य करतो.या युगातील अंतराळ विज्ञानाला संगणकाचा आधार आहे. अंतराळात उपग्रह सोडण्यात संगणकाने मदत केली आहे.हवामानाचा अंदाज दूरदर्शन वरील चित्रदर्शन अशी किती कामे सांगावी या संगणकाची इंटरनेटसारख्या चमत्काराने तर जग जवळ आणण्याचे महान कार्य केले आहे आज कोणतेही क्षेत्र संगणकाच्या स्पर्शा पासून दूर राहू शकत नाही. इतके या संगणकाचे महत्त्व वाढले आहे.
असे या संगणकाचे अधिराज्य सर्वत्र आहे.मग या संगणकाचे आपण गुलाम झालो आहोत काय नाही एक गोष्ट नक्की की या संगणकाचा निर्माता माणूस आहे माणूसच संगणकाला माहिती व आज्ञावली देतो अंतिमतहा या आधी राज्याचा दुरुस्त नियंत्रक माणूसच आहे आज आपण बघतो की अगदी कोरोनाच्या काळामध्ये आपली शाळा बंद असताना आपल्या पर्यंत शिक्षण पोहोचण्याचे काम सुद्धा संगणक किंवा संगणकाचे छोटे रूप म्हणजेच मोबाईल करतो. यावरच आपण दररोज शिकतो त्यामुळे संगणकाचे महत्त्व खूप मोठे आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या