उतारा व प्रश्नावली क्रमांक ११
एखाद्या निरभ्र रात्री जेव्हा तुम्ही आकाशाकडे पाहता,तेव्हा तुम्हाला दूरवर सहस्त्रावधी तारका लुकलुकताना दिसतात. जणू काही आकाशाच्या काळ्या पार्श्वभूमीवर चिकटवलेल्या आहेत, अशा दिसतात. तुम्हाला आश्चर्य वाटले असेल की एकाच ठिकाणी रात्र-रात्र कशा राहतात.त्या खाली का पडत नाहीत. मजेची वस्तुस्थिती अशी आहे की तारका एकाच ठिकाणी राहत नाही. त्या आपल्या मार्गावर सावकाश सरकत आहेत. जशी पृथ्वी आणि इतर आठ ग्रह सूर्याभोवती आपल्या मार्गावर फिरत राहतात.तुम्हाला वाटते की तारका एकाच ठिकाणी असतात. कारण तुम्हाला त्या फिरताना दिसू शकत नाहीत. याचे कारण त्या आपल्यापासून लक्षावधी किलोमीटर दूर आहेत.त्या फिरत असूनही आपल्याला त्या एकाच ठिकाणी असल्यासारखे दिसतात.शिवाय गुरुत्वाकर्षण या नावाने ओळखली जाणारी एक शक्ती आहे ती तारका फिरत असताना आपापल्या मार्गावर राहतील असे पाहते.ती त्यांना एकमेकांच्या वाटेत येऊ देत नाही.
0 टिप्पण्या