माझा आवडता खेळ आज एकविसाव्या शतकात माणसाला खेळाचे महत्व उमगलेले आहे. शरीर निरोगी राहण्याकरिता व्यायाम योग वा खेळ आवश्यक आहेत. हे सर्वमान्य झाले आहे. आज भारतात क्रिकेट हा अत्यंत लोकप्रिय खेळ झाला आहे.त्यामुळे सहाजिकच क्रिकेट खेळणाऱ्या पेक्षा क्रिकेट पाहणारे ऐकणारे याची संख्या फार मोठी झाली आहे. मी त्यापैकीच एक मी क्रिकेट खेळतो.क्रिकेट संबंधित पुस्तके वाचतो आणि मैदानावर जाऊन व न जमल्यास दूरचित्रवाणीवर क्रिकेटचे सामने पाहतो. असे सामने पाहताना देहभान हरपते.
क्रिकेट हा सांघिक खेळ आहे. यात दोन संघात सामने होतात. प्रत्येक संघात अकरा अधिक तीन खेळाडू असतात.या खेळासाठी चपळता काटकपणा आणि शिस्तप्रियता आवश्यक असते. तीन स्टम्प्स व त्यावरील दोन बेल्स मिळून विकेट म्हणजे यष्टी तयार होते. अशा समोरासमोरील दोन विकेट्स असतात. विकेट ची रुंदी 22.9 सेंटिमीटर असते.दोन विकेट्स मध्ये 22 यार्ड अंतर असते. यालाच पिणं किंवा खेळपट्टी म्हणतात.खेळपट्टीची रुंदी पाच फूट असते. मैदान सामान्यतः वर्तुळाकृती असते.
जेव्हा एक संघ फलंदाजी स्वीकारतो तेव्हा दुसरा संघ गोलंदाजी पत्करतो्. दिवसा खेळल्या जाणाऱ्या कसोटी क्रिकेटसाठी लाल रंगाचा चेंडू वापरतात तर दिवसरात्र खेळल्या जाणाऱ्या एकदिवसीय सामन्यासाठी सफेद रंगाचा चेंडू वापरतात. बँट लांबी 34 इंचापेक्षा व रुंदी साडेचार इंचापेक्षा अधिक नसावी. याचे वजन मात्र निश्चित नसते.
खेळात फलंदाजी गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण या सर्व बाबतीत आपले नैपुण्य दाखवता येते. चौकार षटकार मारणाऱ्या अवघड झेल पकडणार्या खेळाडुला प्रेक्षक डोक्यावर घेतात. क्षणाक्षणाला चुरस वाढवणारा असा हा खेळ आहे.
सध्या कसोटी सामन्याबरोबर एकदिवसीय सामनेही खेळले जातात.या प्रकारचे सामने लोकप्रिय झाले आहेत. कारण त्यांचा निकाल झटपट लागतो.आपल्या देशात अनेक उत्कृष्ट क्रिकेटवीर होऊन गेले व आजही आहेत. त्यांनी जागतिक कीर्ती मिळवली. आज सचिन तेंडूलकर हा सर्वांचा आवडता खेळाडू आहे.
क्रिकेटमध्ये वैयक्तिक विक्रमाची नोंद ठेवली जात असली तरी या खेळात सांघिक एकता हीच महत्त्वाची आहे. की काही वेळेला एखाद्या खेळाडूने भरपूर धावा केल्या तरी संघाला यश मिळत नाही हे लक्षात येते की क्रिकेट हा एक खेळ आहे प्रत्येक खेळाडूला अतिशय जबाबदारीने खेळावे लागते कारण त्यावरच त्यांच्या संघाचा आणि पर्यायाने देशाचा लौकिक अवलंबून असतो. तसेच आता ट्वेंटी-ट्वेंटी सारखे छोट्या काळात पूर्ण होणारे सामने सुद्धा निघालेले आहेत. हे सामने सर्व जगभरात प्रसिद्ध झालेले आहेत यामुळे ही प्रेक्षकांची संख्या खूप वाढलेली आहे.
0 टिप्पण्या