विज्ञानाचे चमत्कार विज्ञानाचे चमत्कार किती विलक्षण व अद्भुतरम्य आहेत.आपल्या भोवतालच्या अज्ञानाचा अंधार विज्ञानाच्या प्रकाशाने दूर झाला आहे. विजेच्या सहाय्याने माणसाने आपले मर्यादित मानवी सामर्थ्य अनेक पटीने वाढले आहे.आजच्या गृहिणी जवळ स्वयंपाक घरात विजेवर चालणारी अनेक उपकरणे आहेत. ही उपकरणे गृहिणीचे काम त्वरित आणि तत्परतेने करतात. विजेच्या साहाय्याने चालणारा पंखा आणि कुलर उन्हाळा सुसह्य करतात.तर विजेच्या सहाय्याने चालणारा पंखा आणि कुलर उन्हाळा सुसह्य करतात.तर विजेच्या शेगडी मुळे थंडीचा कडाका ही सुखावलो होतो.
माणसाच्या व्यक्तिगत जीवनात प्रमाणेच औद्योगिक क्षेत्रातही विज्ञानाने फार मोठी क्रांती केली आहे. वैज्ञानिक प्रगतीमुळे अत्याधुनिक छपाई यंत्रावर दैनिक वृत्तपत्राच्या लाखो प्रती काही तासातच छापून वितरणासाठी तयार होतात.असंभाव्य वाटणाऱ्या गोष्टी विज्ञानाने माणसाला सहज साध्य करून दिल्या आहेत. आज माणसाने विज्ञानाच्या साह्याने भूमी प्रमाणेच सागरावर आणि अंतरिक्षा वही स्वामित्व मिळवले आहे. तो आता सागराच्या उदरातही प्रवेश करू शकतो.अंतराळयानाच्या साह्याने माणसाने वसुधेची व सूर्याची परिक्रमा केली आहे. चंद्रावर पाऊल टाकले आहे.आणि आता तो अन्य ग्रहांवरही पाऊल टाकण्याच्या प्रयत्नात आहे.
विज्ञानाच्या सहाय्याने वैद्यकीय क्षेत्रातही मानवाने फार मोठी झेप घेतली आहे. मानवाची निरुपयोगी झालेले अवयव शस्त्रक्रिया करून बदलता येतात. व्यक्तीला सुंदर बनवले जाते तर अपंगाचे व्यंगत्व घालून त्याला जीवनात यशस्वी वाटचाल करण्याची प्रेरणा दिली जाते. ही सारी विज्ञानाची किमया आहे. रक्तदानाच्या पुढचे पाऊल अवयवदान दुर्बिणीतून शस्त्रक्रिया होऊ लागेल त्यामुळे शल्यक्रिया चे काम सुलभ झाले.
विज्ञानाच्या मदतीने माणसाने भूगोलावर ही मात केली. एकेकाळी वाळवंटी असलेल्या प्रदेशात आता फुलबागा बहरत आहेत.वसुंधरेची उत्पादनक्षमता वाढवून हरितक्रांती साधली जात आहे. माणसाने विज्ञानाच्या मदतीने आपल्या मनोरंजनाच्या साधनांत भर टाकली आहे. संगणकाच्या शोधाने तर माणसाने फार मोठी प्रभावी सामर्थ्य संपादन केले आहे.अशक्य गोष्टी शक्य केले आहेत. या प्रयोगातून माणूस जणू विश्वनिर्मिती लाच आव्हान देत आहे.
विज्ञानाचे चमत्कार जेवढे सुखद आहेत तितकेच विज्ञानाने माणसाच्या विनाशक सामर्थ्यात केलेली वाढ भयावह आहे.एका अणुबॉम्बने हिरोशिमातील हजारोंचे जीवन उद्ध्वस्त केले आहे. असे आहेत हे विज्ञानाचे चमत्कार अंगावर आनंदाचे रोमांच फुलवणारे तसेच भीतीचा काटा उभा करणारे.
0 टिप्पण्या