उतारा व प्रश्नावली क्रमांक ३
सेनापती संताजी घोरपडे यांचा वध झाल्यापासून मराठ्यांची बाजू जरा कमजोर झाली होती. संताजींचा धाक आणि दहशत गेल्यामुळे मोगलांना जरा हायसे वाटू लागले होते.यामुळे जिंजीचा किल्ला त्वरेने हस्तगत करण्याचा तगादा बादशहा औरंगजेबाने झुल्फीकारखानाच्या मागे लावला होता.बादशहाच्या हुकमाची अंमलबजावणी करून झुल्फीकारखानाने जि़जीच्या किल्याला त्वरित वेढा दिला होता.श जिंजीच्या किल्ल्यात गेली सात-आठ वर्षे छत्रपती राजाराम महाराज होते. परंतु महाराष्ट्रातील रामचंद्रपंत अमात्य बरोबर त्यांचा पत्रव्यवहार चालू होता. माणसे जात येत होती पण आता झुल्फीकारखानाने दिलेला वेढा दिवसेंदिवस सक्तीचा व कडक होऊ लागल्यामुळे किल्ल्याबाहेर जाणे-येणे मराठ्यांना कठीण होऊ लागले होते.
0 टिप्पण्या