फुल भर दुधाची कहाणी


 फुल भर दुधाची कहाणी 

आटपाट नगर होते तिथे एक राजा राज्य करीत होता तो अतिशय धार्मिक वृत्तीचा होता नगरात महादेवाचे मोठे मंदिर होते राजाने दवंडी पिटवली की येत्या महाशिवरात्रीला सर्व प्रजा जणांनी सूर्योदयापूर्वी महादेवाला दुधाचा अभिषेक करावा राजेसाहेब सूर्योदयाला महादेवाच्या दर्शनास येतील महाशिवरात्रीच्या दिवशी सर्व नगर निवासी सूर्य उगवण्यापूर्वी महादेवास दुधाचा अभिषेक करण्यास निघाले मात्र प्रत्येकाने मनात असा विचार केला की बाकी सगळे दुधाचा अभिषेक करणार आहेत अंधार आहे मी दुधाऐवजी पाणी घातले तर कोणाला कळणारही नाही माझे दुधही वाचेल असा विचार करून सर्वांनी पाण्याचा अभिषेक केला सकाळ होताच महाराज दर्शनाला आले पाहतात तर काय मंदिराचा गाभारा पाण्याने भरलेला लोकांना आपली चूक कळून आली महाराजांच्या लक्षात आले की लोकांना जबरदस्ती केली की त्याचा वाईट परिणाम होतो.

 बोध - मनाविरुद्ध कृतीस कायदा उपयोगी पडत नाही.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या