माझा देश भारत माझा देश आहे.याचा मला सार्थ अभिमान आहे. माझ्या या भारताचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे येथे विविधतेत एकता आहे. भारत हा विशाल देश आहे. भारताच्या नावाबाबत ही अनेक कथा दृढ आहेत. या विशाल देशाची लोकसंख्या ही अफाट आहे. भारताच्या लोकसंख्या ने अलीकडे नुकताच एका अब्जाचा चा टप्पा ओलांडला आहे.
भारतात भौगोलिक विविधता आहे. सर्व प्रकारचे ऋतुमान वेगवेगळ्या भागात एकाच वेळी आढळते. तरीपण मोसमी वाऱ्याचे वरदान,हिमालयाची मायेची पाखर आणि गंगा, यमुना, कृष्णा,गोदावरी यासारख्या अनेक नद्यांची मायाममता यावर पोसलेली ही भूमी एकेकाळी सुवर्णभूमी म्हणून ओळखली जात असे. अशा या भारतावर निसर्ग खरोखरच प्रसन्न आहे नैसर्गिक सौंदर्याची एवढी विविधता अन्यत्र कोठेही आढळत नाही.
भारताचा इतिहास ही मोठा रोमांचक व स्फूर्तिदायक आहे.भारताची सर्वात मोठी ठेव म्हणजे प्राचीन भारतीय संस्कृती. हजारो वर्षाची तेजस्वी परंपरा तिला लाभली आहे.भारताचे आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे भारतात बोलल्या जाणाऱ्या विविध भाषा.या सार्या भाषा आपापल्या साहित्याने समृद्ध आहेत. हिंदी ही भारताची राष्ट्रभाषा तर सत्यमेव जयते हे भारताचे ब्रीद वाक्य. भिन्न धर्म पंथ जाती अंगीकारलेले कोट्यावधी लोक या देशात राहतात गुण्यागोविंदाने नांदतात. शेतीची उत्पादने उद्योग-व्यवसाय यात जशी भिन्नता आहे तशी नृत्य संगीत चित्रकला इत्यादी ललित कलांचा आविष्कार आतही भिन्नता आहे. कारण शेवटी आम्ही सर्वजण भारतीय आहोत आम्ही भारतीय अनेकदा एकमेकांशी भांडतो वाद घालतो क्वचित संघर्षही करतो पण इतिहास काय सांगतो वर्तमान कशाची ग्वाही देतो की ज्या ज्या वेळी भारतावर परकीय आक्रमण आले संकट आले मग ती नैसर्गिक असो वा मानवनिर्मित असो त्या त्या वेळी आम्ही भारतीय सारे मतभेद विसरून एकदिलाने आणि यशस्वीपणे त्या संकटाला सामोरे गेलो आहोत त्यामुळे जगाच्या पाठीवर कोठेही वावरणाऱ्या भारतीयाच्या मनात एक मंत्र सदैव गुंजत असतो तो म्हणजे माझा भारत महान.
0 टिप्पण्या