नाटक


 नाटक 

कलकत्ता शहरातील गोष्ट. एक मोठा बंगला होता. एक लठ्ठ मांजर त्या बंगल्यात राहत होते. एक म्हातारी उंदरीन आपल्या पिलासह त्याच बंगल्यात राहत होती. ते मांजर त्या लहान उंदराला पकडायला नेहमी टपून बसलेले असे. परंतु उंदरीन संधी मिळू देत नव्हती. डोळ्यात तेल घालून आपल्या लाडक्या पिलांचे रक्षण करीत होती. जराही त्याला डोळ्या आड होऊ देत नव्हती. एके दिवशी मांजराने उंदीरीला व तिच्या पिल्लाला फसविण्यासाठी नाटक केले. मांजर बंगल्यांच्या व्हरांड्यात मरण पावल्याचे सोंग घेऊन पडून राहिली. तो छोटा उंदीर आपल्या आईला म्हणाला आई ते बघ दृष्ट मांजर कसे मरून पडले आहे. आपण आता निर्धास्तपणे बाहेर जाऊन खेळू म्हातारी उंदरीन म्हणाली बाळ ते गरीब बिचारे मांजर मेले पण आपण थोडा वेळ थांबूया. तो बघ तो मोठा कुत्रा इकडेच येतोय तो आता या मांजराला खाऊन टाकेल.मंग लगेच आपण खेळायला अंगणात जाऊ.

 मांजरानी हे ऐकले ते असे काही घाबरले कि ते उठले केंव्हा पळाले हे कळले देखील नाही.

 तात्पर्य - लबाड घातकी माणसाच्या नाटकी वागण्याला फसवू नये.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या