भीमाचे गर्वहरण

 भीमाचे गर्वहरण


 एकदा भीम जंगलातून जात होता. वाटेत त्याला एक शेपटीआडवी पसरलेली दिसली. बाजूला झाडाखाली एक म्हातारे माकड बसले होते. त्याचीच ती लांबलचक शेपटी होती.

 भीम म्हणाला हे माकडा तुझी शेपटी बाजूला घे माकड म्हणाले मी म्हातारा झालो आहे. फार आजारी आहे. माझी शेपटी  मलाच उचलता येत नाही. तेव्हा माझ्यावर दया कर आणि शेवटी तूच बाजूला कर. भीम म्हणाला तुझ्या घाणेरड्या शेपटीला मी हात लावू काय. उचल ती लवकर.

 माझी शेपूट तुटली तर माकड किंचित हसले आणि म्हणाले आणि समजा तुझी गदा तुटली तर.

 एक म्हातारे माकड आपली थट्टा करीत आहे हे पाहून भीमाला राग आला. त्याने रागारागाने शेपटीला गदा लावली पण शेपटी हलेना त्याने शेपटी खाली गदा घातली पण ती शेवटी उचलू शकेना त्याने सगळी शक्ती लावली. त्याला दम लागला तो घामाघूम झाला. पण शेपटी हलेना मग त्याने शेवटी खालून गदा काढून घेण्याचा प्रयत्न केला पण त्याला गदा ही काढता येईना.

 आता कुठे भीमाला कळले की हे साधे व सामान्य माकड नाही हे त्याच्या लक्षात आले.

भिम नम्रपणे म्हणाला महाराज आपण कोण आहेत माकड म्हणाले मी राम भक्त हनुमान आहे आणि भीमा समोर हनुमानाचे प्रचंड रूप उभे राहिले.

 भीमाने महाबली हनुमानाला वंदन केले तो म्हणाला मला माझ्या शक्तीचा गर्व झाला होता मला क्षमा करा मला क्षमा करा हनुमानाने भीमाला क्षमा केली व आशीर्वाद दिला.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या