एकीचे बळ


 एकीचे बळ 

एका शाळेतील ही गोष्ट आहे. एकदा एका शिक्षकांनी आपल्या विद्यार्थ्याला एक मोठा दगड उचलण्यास सांगितले. त्या विद्यार्थ्याने एका हाताने दगड उचलण्याचा प्रयत्न केला पण त्याला तो उचलता येईना. मग त्याने दुसऱ्या  हाताचा उपयोग केला तरीसुद्धा तो दगड उचलू शकला नाही. मग त्याने आपल्या मित्रांना बोलावले व  त्यांच्या मदतीने तो दगड सहज उचलला. म्हणजेच तो दगड दोन हाताने उचलू शकत नव्हता. तो दगड चार-सहा हात मिळून सहज उचलला गेला.

 तात्पर्य - एकीचे बळ सर्वश्रेष्ठ असते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या