लांडगा आणि कोकरु


 लांडगा आणि कोकरू

एक कोकरू होते. एके दिवशी ते झ-यावर पाणी पीत होते. इतक्यात एक लांडगा पाणी पिण्यासाठी तेथे आला. कोकराला पाहून त्याला वाटले ह्या छोट्या कोकराचे मास नक्कीच लुसलुशीत आणि चवदार असणार. याला पकडून खाल्लच पाहिजे.

 लांडगा कोकराच्या जवळ गेला व म्हणाला तू तोंड लावून माझे  प्यायचे पाणी खराब केले आहेस.

 कोकरु भाबडेपणाने त्याला म्हणाले माझ्यामुळे पाणी कसं काय खराब होईल. कारण  पाणी तुझ्याकडून माझ्याकडे वाहत येत आहे. लांडगा म्हणाला मला उलट उत्तर देऊ नकोस कदाचित मागच्या महिन्यात माझ्याशी भांडला तो तूच असशील. कोकरु म्हणाले पण मागच्या महिन्यात तर माझा जन्म देखिल झाला नव्हता.

 असे असेल तर मागच्या महिन्यात तुझी आई माझ्याशी भांडली असेल असे म्हणत लांडग्याने त्या गरीब कोकरावर झडप घातली आणि त्याला ठार मारले.

 घातकी माणसापासून नेहमी दूर राहावे.

टिप्पणी पोस्ट करा

1 टिप्पण्या