कुत्रा व गाढव
एका गावात एक धोबी होता, त्याच्याकडे राजू नावाचा सुंदर छोटा कुत्रा होता, व एक करुप म्हातारे गाढव होते. गाढवाचे नाव बुद्धू होते.
राजुचे मालकाच्या घरात खूप लाड होत होते. त्याला घरात व घराबाहेर अगदी कुंपणापर्यंत कोठेही खेळण्यास मोकळीक होती. घरातील मुले त्याच्या बरोबर नेहमी खेळत एवढेच नव्हे तर म्हातारा धोबी व त्याची बायकोही राजूला लाडाकोडाने गोंजरायची.खुशाल आपले अंग चाटू द्यायची.
एके दिवशी बुद्धीने पाहिले राजू मालकाला आपल्या मागच्या पायांनी लाथा झाडीत आहे. मालक खदाखदा हसतो आहे. त्याला पकडण्याचा प्रयत्न करतो आहे.खेळता-खेळता राजू पटकन परत वरून मालकाचे तोंड चाटत आहे.व या वेळी मालक त्याचे डोके लाडेलाडे थोपाटत आहे.
बुध्दुला वाटले, आपणही राजू सारखे केले तर आपलेही कौतुक मालक करीन मग त्याच दिवशीच्या सायंकाळी जेव्हा बुद्धूचा मालक कपड्यांचे भले मोठे गाठोडे घेऊन घरात आला तेव्हा बुद्धूने आपल्या मागच्या पायांनी लाथा मारल्या लगेच परत वळून मोठ मोठ्याने ओरडत लाडा लाडाने मालकाचे तोंड चाटण्याचा प्रयत्न करु लागला. त्यामुळे धोबी असा काही संतापला म्हणता, की त्याने बुध्दूला बांबूच्या काठीने झोडपून काढले.
तो पुढे म्हणाला मुर्खा तुला काय वाटते ? आपण राजू सारखी सुंदर व लाडके आहोत. तुझी जागा ओळखून वाग. शहाणा हो..
तात्पर्य - प्रत्येकाने आपला दर्जा ओळखून वागले पाहिजे.
0 टिप्पण्या