एक मोर होता.तो फार बढाईखोर होता.स्वतःच्या रूपाचा त्याला फार गर्व होता.तो दररोज नदीकिनारी जायचा.पाण्यात आपले प्रतिबिंब पहायचा व .स्वतःशीच आपल्या सौंदर्याची खूप स्तुती करायचा.त्याला स्वतःच्या सौंदर्याचा खूपगर्व झाला होता.
मोर नेहमी म्हणायचा."माझा डौलदार पिसारा पहा ! त्या पिसा-या वरील सुंदर मोहक रंग पहा,जगातील सर्व पक्ष्यांमध्ये मीच सर्वात सुंदर एकमेव पक्षी आहे."एका दिवशी मोराला नदी किनाऱ्यावर एक करकोचा दिसला.मोराने त्याच्याकडे पाहून आपले तोंड फिरवले.मंग तुच्छतेने करकोच्याला म्हणाला.अरे किती रंगहीन आहेस तू ! तुझे पंख पांढरे फटक आणि निस्तेज आहेत.तुला माझ्यासारखे सुंदर रंगीत पिसारे नाहीत.
करकोचा म्हणाला,अरे मित्रा तुझा पिसारा नक्कीच खूप सुंदर आहे.पण माझे पंख तुझ्यासारखे सुंदर नाहीत. म्हणून काय झाल ? तुझ्या पंखांनी तू उंच उडू शकत नाही.मी मात्र माझ्या पंखांनी आकाशात खूप उंच उडू शकतो.एवढे बोलून करकोचा झपकन आकाशात उंच उडाला.मोर खूप खजील होऊन त्याच्याकडे बघत राहिला.दिखाऊ सौंदर्यापेक्षा उपयुक्तता नेहमी महत्वाची असते.
0 टिप्पण्या