विचार करून बोलावे

 विचार करून बोलावे


 एकदा एक म्हातारी अकबराकडे आली व म्हणाली महाराज माझा जावई माझ्या मुलीला खूप त्रास देतो तेव्हा त्याचा बंदोबस्त करा.

 अकबराने ताबडतोप राज्यातील सर्व जावयांना पकडून फाशी द्या असा हुकूम काढला व बिरबलाला त्याची अंमलबजावणी करण्यास सांगितले.

 बिरबल म्हणाला महाराज फास तयार करण्यासाठी काही वेळ द्या एके दिवशी महाराज व बिरबल तयार झालेले फास बघण्यास गेले त्यामध्ये दोन फास सोडून सर्व फास्त लोखंडी होते. त्या दोन्हीपैकी एक फास सोन्याचा होता व एक चांदीचा होता ते पाहून बिरबलाला म्हणाला बिरबल हे दोन फास कोणाचे?

 बिरबल म्हणाला महाराज सोन्याचा  आपल्यासाठी व चांदीचा फास माझ्यासाठी आपण देखील कोणाचे तरी जावईच आहात.

 हे ऐकल्यावर अकबराने आपला काढलेला वटहुकूम मागे घेतला.

 तात्पर्य - कोणताही हुकुम किंवा आदेश देण्यापूर्वी त्याचा पूर्ण विचार करूनच तो आदेश द्यावा. थोडक्यात विचार करून बोलावे बोलून नंतर विचार करू नये.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या