श्रावणबाळ

 श्रावण बाळ


 दाट जंगल होते. रात्रीची वेळ होती अयोध्येचा राजा दशरथ शिकारीसाठी एका झाडावर बसलेला होता. जवळून एक नदी वाहत होती. अचानक नदीच्या बाजूने बुडबुड असा आवाज आला. दशरथाला वाटले कोणी पशू जंगलात पाणी पीत असावा त्याने आवाजाच्या दिशेने बाण सोडला. आणि त्याच क्षणी हाय मेलो हे शब्द दशरथाने ऐकले. आपला बाण एका माणसाला लागला आहे हे त्याच्या लक्षात आले. लगेच झाडावरून त्या माणसाजवळ गेला.

 छातीत बाण घुसल्यामुळे एक कुमार कण्हत होता. रिकामा कमंडलू जवळच पडला होता. दशरथाने त्याच्या छातीतुन बाण काढून टाकला आणि विचारले कुमार तू कोण आहेस मला क्षमा कर हे पाणी पी. कुमार क्षीण आवाजात म्हणाला माझे नाव श्रावण मी आता मरणार जवळच एका झाडाखाली माझे आई-वडील आहेत. ते म्हातारे आहेत आंधळे आहेत. त्यांना फार तहान लागली आहे. कृपा करून त्यांना पाणी नेऊन द्या एवढे बोलून श्रावणाने प्राण सोडला. कमंडलूतून पाणी घेऊन दशरथ राजा श्रावणाच्या आई वडिलांकडे गेला. परंतु त्याला बोलण्याचा धीर होईना श्रावणाचे वडील म्हणाले बाळ एवढा उशीर का केलास तू बोलत का नाहीस दशरथ म्हणाला मी तुमचा श्रावण नाही मी अयोध्येचा राजा दशरथ आहे माझ्या हातून श्रावण चुकून मारला गेला मला क्षमा करा.

 हे ऐकून श्रावणाचे वडील म्हणाले अरे आमचा लाडका श्रावण आम्हाला या कावडीतून काशीयात्रेला नेत होता तो आमचे कपडे धूत असे आमचे जेवण तयार करीत असे. आम्हाला जेवू घालीत असे औषध पाणी देत असे फार प्रेमाने आमची सेवा करीत असे श्रावण म्हणजे आमचा प्राण होता.दशरथा आमच्या श्रावणाला तु ठार मारले आता पुत्र शोकाने आम्ही दोघेही मरणार आहे. मी तुला शाप देतो की तू सुद्धा पुत्र शोकाने मरशील.

 मग त्या वृद्ध आईवडिलांनी श्रावण बाळ श्रावण बाळ असे म्हणत प्राण सोडला.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या