मांजर तोंड कधी धुते
मनी मांजराला एकदा मोठा उंदीर सापडला.उंदीर होता फार लबाड! तो तिला बोलला."मनुताई मला खाणार असलीस तर खुशाल खा,पण आधी तोंड धु आणि मंग खा ! शहाणे लोक आधी तोंड धुतात मंग खातात,होय की नाही!
मनीला हे बोलणे पटले.तिने उंदराला बाजूला ठेवले.मंग ती तोंड धुवायला नदीवर गेली.हे पहाताच उंदीरमामांनी पळ काढला.ते बिळात जाऊन लपले.आणि आतून डोकावून पाहू लागले.जरा वेळाने मनी परत आली तिला ते बोलले, मनुताई राम राम !
मनीने बिळाकडे पहिले तसा उंदीर आत लपला.मनीला फार राग आला.तिने बिळाकडे झडप घातली.पण उंदीर कसा सापडणार आता ? या वेळेपासून मनीने ठरवले आधी खायचे , आणि मंग तोंड धुवायचे ! आता सगळी मांजरे आधी खाउन घेतात आणि मंग सावकाश तोंड धुतात.
0 टिप्पण्या