सिंह आणि उंदीर
एका रानात एक सिंह राहत होता आणि त्याच्या गुहेत एक उंदिर राहत होता सिंह एकदा झोपला असता उंदीर उगीच त्याच्या अंगावरुन इकडून तिकडे पळत होता सिंहाने वैतागून संधी मिळताच त्याला पंजाने पकडले त्याबरोबर तो गयावया करू लागला व म्हणाला तु मला मारू नकोस मी तुझ्या उपयोगी पडेल सिंह म्हणाला तू कसला माझ्या उपयोगी पडणार जा आता सोडून देतो पुन्हा मला त्रास दिलास तर याद राख काही दिवसांनी सिंह चुकून शिकाऱ्याच्या जाळ्यात अडकला काही केले तरी त्यास बाहेर येता येइना इतक्यात तो उंदीर तिथे आला तो सिंहाला म्हणाला तू आवाज न करता पडून राहा मी जाळे कुरतोडतो उंदराने जाळी कुरतडून सिंह हळूच बाहेर येऊ शकेल असे मोठे भोक जाळ्यात पाडले सिंह हळूच बाहेर आला व त्याने उंदराचे आभार मानले अशा रीतीने उंदराने आपले म्हणणे खरे केले
बोध - लहान सुद्धा मोठ्या मदत करू शकतात.
0 टिप्पण्या