वाघोबा ठराविक वेळेत जातो व येतो.हे एका छोट्या व धिटूकल्या सशास माहित होते.त्याने एक दिवस वाघोबाची गंमत करायचे ठरवले.वाघोबा नदीवर पाणी प्यायला गेला होता.तेंव्हा ससोबा हळूच त्याच्या घरात येऊन गुपचूप बसला.त्याने जाळीचे दार आतून लाऊन घेतले होते.
वाघोबा घरी परत आला.घराचे दार बंदपाहून त्याला गंमत वाटली.त्याने दार टकटक वाजवले आणि "कोण आहे घरात? असे विचारले .आतून ससोबा म्हणाले.
"मी आहे ससुल्या गडी डूल डूल डुलक्या मारी.वाघोबाचे डोळेच फोडीन."
बापरे ! डोळे फोडले तर मला दिसणार कसे? वाघोबा घाबरून पळतच सुटला.पळता पळता वाटेत त्याला हत्ती भेटला.हत्तीने विचारले काय रे बाबा का एवढा पळतोस ? झाल काय तुला ? अरे बाबा माझ्या घरात कोण बसलंय कोण जाने ! पण मला म्हणाला ,तुझे डोळे फोडीन.हत्ती हसायला लागला.चल मी येतो तुझ्या घरी.हत्तीने दारावर टकटक केले,आणि विचारले कोण आहे वाघोबाच्या घरात ? ससुल्या म्हणाला,
"आहे ससुल्या गडी,डूल डूल डुलक्या मारी.
वाघोबाचे डोळेच फोडीन, हत्तीची सोंडच कापीन !"
हत्ती पण घाबरला म्हणाला , अरे माझी सोंड तुटली तर मी पाणी कसे पिणार ? अंघोळ कशी करणार ? हत्ती आणि वाघोबा पळत सुटले.
पळता पळतावाटेत अस्वल भेटलं , अस्वलाने विचारले कारे पळता ?
हत्ती म्हणाला " अरे वाघोबाच्या घरात कोण बसलंय कुणास ठाऊक ! पण म्हणतंय मी वाघोबाचे डोळे फोडीन ,हत्तीची सोंड कापीन म्हणूनआम्ही पळतोय. " अस्वल म्हणाले चल मी बघतोय कोण आहे ते" अस्वल,हत्ती,वाघोबा सगळे घरी आले.अस्वलाने दार वाजवले. टक टक टक कोण आहे रे घरात ? ससुल्या म्हणाला.
" मी आहे ससुल्या गडी ,डूल डूल डुलक्या मारी.वाघोबाचे डोळेच फोडीन,हत्तीची सोंडच कापीन,अस्वलाचे केसच उपटीन." असे ऐकल्यावर अस्वल पळत सुटले वाटेत भेटला उंट दादा.त्याने पण का पळता म्हणून विचारले.अस्वलाने घाबरत घाबरत सर्व सांगितले.'थांबा बघतोच मी कोण आहे ते 'उंटाने दार वाजवले कोण आहे रे घरात ? ससुल्या म्हणाला .
" मी आहे ससुल्या गडी,डूल डूल डुलक्या मारी वाघोबाचे डोळेच फोडीन ,हत्तीची सोंडच कापीन अस्वलाचे केसच उपटीन,उंटाची मानच मोडीन.उंट पण घाबरला सगळे पळायला लागले.वाटेत भेटला कोल्होबा. कोल्होबाला सर्व हकीकत सांगितली चला मी बघतो त्याचीच फजिती.कोल्होबाने दार वाजवले.ससुल्या म्हणाला.
" वाघोबाचे डोळेच फोडीन,हत्तीची सोंडच कापीन , अस्वलाचे केसच उपटीन,उंटाची मान मोडीन,कोल्होबाची शेपूटच तोडीन,कोल्होबा घाबरले नाहीत.बर का ते म्हणाले.अस होय , तर मंग मी ससुल्याचे कानाच उपटीन, हे ऐकल्यावर ससुल्या घाबरला व मांगाच्या दारातून पळून गेला.
0 टिप्पण्या