लावी पक्षीण आणि तिची पिल्ले


 लावी पक्षीण आणि तिची पिल्ले

 एका खेडे गावात एक शेतकरी राहत होता त्याचे खूप मोठे शेत होते ज्वारीची कणसे त्याच्या शेतात डुलत होती लावी पक्षी ने त्या शेतात आपले घरटे बांधले तिच्या घरट्यात दोन पिल्ले होती पक्षीण सकाळीच उठून पिलांसाठी चारा आणि दिवसभर बाहेर जाऊन संध्याकाळी घरट्यात परत येईल पिल्ले दिवसभरात काय झाले ते तिला सांगत एका संध्याकाळी पिलानी तिला  सांगितले की शेतकरी म्हणत होता शेतकऱ्यांना कापणीला बोलावतो आई आपण उद्याच दूर जाऊ नाहीतर त्यांच्या तावडीत सापडू आई म्हणाली नको दुसऱ्या दिवशी शेतकरी म्हणाला गावकरी येत नाहीत मी सगळ्या नातेवाईकांना बोलतो तरी कोणी आले नाही मग म्हणाला माझे शेजारी नक्की येतील पिल्ले आईला निर्णयाची घाई करु लागली पण पक्षींण काही मनावर घेणार शेतकऱ्याने नंतर घरच्यांना घेऊन येतो म्हटले पिल्ले घाबरली पक्षी म्हणाली अजून निघण्याची वेळ झाली नाही म्हणाली आई तो म्हणत होता आता कोणी येवो न येवो मीच कापणीला सुरुवात करतो. पक्षीण पिलांना म्हणाली आता खरी निघण्याची वेळ झाली आहे आपण आत्ताच निघू असे म्हणून पिल्लांना घेऊन ती दूर उडून गेली.

बोध - जो दुसऱ्या वरी विसंबला त्याचा कार्यभाग संपला.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या