जाकनोजी नावाचा शेतकरी होता आपले खूप मोठे शेत असावे असे त्याला वाटे त्याच्या वाचनात एक जाहिरात आली शेतकरी असणाऱ्यास जमीन देणे आहे सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत चालून जाईल तेवढी जमीन तुमची जानोजीला त्याची इच्छा पूर्ण करणारी संधी चालून आली दिलेल्या पत्त्यावर जानोजी हजर झाला ठीक सुर्योदयास त्याने चालावयास सुरुवात केली सूर्य डोक्यावर येईपर्यंत जानोजी ने बरेच अंतर कापले होते आता त्यास सूर्यास्तापर्यंत पूर्वीच्या ठिकाणी पोचायचे होते म्हणून तो चालून झालेली सर्व जमीन त्याची होणार होती जानोजी ने विचार केला आपण आणखी पुढे जाऊ मग मागे फिरू म्हणजे आता पेक्षा आणखीन जमीन आपल्या मालकीची होईल तो तसाच पुढे निघाला सूर्य मावळतीला आला तसा तो नाईलाजाने मागे फिरला त्याने आपल्या चालण्याचा वेग वाढवला खरे तर तो आता दमला होता पण त्याचा नाईलाज होता त्याला आता अधिक अंतर कापायचे होते सूर्यास्तापूर्वी निघण्याच्या ठिकाणी आपण पोहोचणार नाही असे त्यास वाटू लागले म्हणून त्याने पळावयास सुरुवात केली सूर्य अस्तास जिवाच्या आकांताने त्याने सुरुवातीचे ठिकाण गाठले पण अतिश्रमाने तो तिथेच कोसळला आणि गतप्राण झाला गावकऱ्यांनी त्याला पुरण्यासाठी खड्डा खणला आणि म्हणाली खरे तर याला एवढ्या जमिनीची गरज होती असे म्हणून त्यास मुठमाती दिली.
बोध - अतिलोम विनाशकारी असतो.
0 टिप्पण्या