सुखी माणसाचा सदरा

 सुखी माणसाचा सदरा

 राजे विक्रम सिंह फार काळजीत होते गेले कित्येक दिवस राज वैद्यांनी दिलेले औषध घेऊनही त्यांना बरे वाटत नव्ह


ते प्रधानजीनां त्यांनी आपली व्यथा सांगितली त्यावर विचार करून प्रधानजी म्हणाले महाराज तुम्हास औषधाने बरे वाटणार नाही तुम्ही सुखी माणसाचा सदरा घाला त्याने तुम्हास बरे वाटेल महाराजांनी सुखी माणसाच्या शोधात आपले दूत पाठवले दूतांना प्रत्येक माणसाने काही तरी दुःख असल्याचे सांगितले आखेर ते रानात गेले तेथे त्यांना एक लाकुडतोड्या लाकडे तोडताना दिसला दूतांनी त्यास विचारले काय रे तू सुखी आहेस का तेव्हा तो म्हणाला माझ्यासारखा दुसरा कोणी माणूस सुखी नाही हे एकताच दूतांना फार आनंद झाला आणि त्यांनी त्याचा सदरा मागितला पाहतात तर काय त्याच्या अंगात सदरा नव्हता दूत निराश होऊन परतले महाराजांना त्यांनी सारी हकीकत सांगितली महाराजांनी विचार केला सदरा नसून सुद्धा लाकूडतोड्या सुखी आहे आणि सारे वैभव असून मी दुखी काम भरपूर कष्ट करून मिळेल त्यात समाधानी असल्याने तो सुखी आहे मी सुद्धा भरपूर कष्ट केले आणि अधिकाराची हाव धरली नाही तर मी सुद्धा सुखी होईल.

 बोध भरपूर कष्ट करा आणि मिळेल त्यात समाधान माना.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या